LIC चा बाप! रु. 450/- साठी 1 कोटी रुपयांचा विमा मुदत विमा सर्वोत्तम मुदत विमा योजना

मित्रांनो,आजकाल जीवनाचा भरोसा राहिला नाही. म्हणून प्रत्येक जण हे विम्याचा आधार घेत आहे. जेणेकरून त्यांच्या माघारी त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण त्या विम्याच्या आलेल्या पैशातून होईल. जर तुम्हाला विमा काढायचा असेल तर तुम्ही रुपये 450 चा विमा काढू शकता. त्याचा आपल्याला एक कोटी रुपयांचा परतावा मिळत असतो. या विमा बद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

आयुर्विम्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे टर्म इन्शुरन्स आणि दुसरा कायमस्वरुपी विमा. पैकी टर्म इन्शुरन्समध्ये ठरलेल्या मुदतीपर्यंत तुम्हाला हप्ते भरायचे असतात. पैसे तुमच्या पश्चात तुमच्या नॉमिनीला मिळतात. थोडक्यात तुमच्या नंतर तुमच्यावर अवलंबून लोकांची आर्थिक काळजी घेणारा हा इन्शुरन्स आहे. पण, मुदतीनंतर तुम्ही जिवंत असाल तर मात्र तुम्हाला लाभ मिळत नाही. हाच इतर आयुर्विमा आणि टर्म इन्शुरन्सचा फरक आहे. टर्म इन्शुरन्स हे एकच माध्यम आहे जे आपल्या सर्व आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतं.

 

घरातली कर्ती व्यक्ती आपल्या नोकरीच्या काळात कुटुंबीयांच्या सर्व आर्थिक गरजा भागवत असते. शास्त्रीय परिभाषेत या जबाबदारीची मोजदाद मानवी जीवन मूल्यामध्ये होत असते. घरातल्या सर्वांच्या आर्थिक गरजा लक्षात घेतल्या तर अशा व्यक्तीचं जीवन मूल्य हे दीड-दोन कोटींच्या घरात जातं. आणि मिळकत कमी असो किंवा जास्त, इतक्या रकमेची शाश्वती देणारा एकमेव उपलब्ध पर्याय आहे टर्म इन्शुरन्सचा. अलीकडे शहर असो किंवा ग्रामीण भाग. जवळ जवळ प्रत्येकावर गृहकर्ज असतं.

 

त्यासाठी टर्म इन्शुरन्स खूप मोलाचा आहे. कर्जाची परतफेड ही मोठी आर्थिक जबाबदारी आहे. काही लाखांत किंवा कधी कधी कोटींमध्ये ही कर्जाची रक्कम असते. दुर्दैवाने कमावत्या व्यक्तीचा मृत्यू कर्ज फेडण्यापूर्वीच झाला तर? ही कल्पना भयावह आहे. कारण, हा भार आता त्यांच्या नॉमिनीला उचलावा लागणार आहे. पण, टर्म इन्शुरन्स एकरकमी पैसे देत असल्यामुळे तुम्ही गेल्यानंतरही ही जबाबदारी इन्शुरन्स घेतो. ही एक पद्धत आहे. ज्यात तुम्ही किती वर्षं नोकरी करणार आहात हे महत्त्वाचं ठरतं. त्या काळात तुम्ही जमा केलेली रक्कम आणि पुढच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन विम्याची रक्कम ठरवली जाते.

 

महागाईचा दर पुढे किती वाढणार आहे. त्या अंदाजाने या दरावर आधारित विम्याची रक्कम ठरवले जाते. पण, गुंतवणूक तज्ज्ञ तुमच्यासाठी हे गणित सोपं करू शकतील. टर्म इन्श्युरन्सचा हप्ता तुलनेनं अगदी कमी असतो. कमी हप्त्यात विमा संरक्षण मात्र तगडं मिळतं. अर्थात मुदतीनंतर तुम्ही जीवंत असाल तर लाभ मात्र मिळत नाही. ज्याच्या नावावर टर्म इन्श्युरन्स आहे, त्याच्या मृत्यूनंतर नॉमिनीला विम्याची पूर्ण रक्कम मिळते. काही टर्म प्लानबरोबरच अतिरिक्त फायदे मिळत असतात. उदा. थोडा जास्त हप्ता भरलात तर आरोग्य विम्याचे काही फायदे मिळू शकतात.

 

हे इन्श्युरन्स देणाऱ्या कंपनीवर अवलंबून आहे.

मुदत पूर्ण होईपर्यंत हप्ता एकच राहतो. तो बदलत नाही

तुम्ही तुमच्या आयुष्याची किंमत मोजू शकत नाही, तथापि, तुम्ही हे सुनिश्चित करू शकता की तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबाला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. रु. 1 कोटी टर्म इन्शुरन्स प्लॅन हा एक आर्थिक उपाय आहे. जो तुमच्या अनुपस्थितीतही तुमच्या कुटुंबाला तुमच्या उपस्थितीची जाणीव करून देतो. टर्म इन्शुरन्स पॉलिसी अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत आणि पॉलिसी खरेदीदारांमध्ये 1 कोटी रुपयांची टर्म इन्शुरन्स योजना सर्वसामान्यांची पसंती होत आहे.

 

1 कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्स प्लॅनचा अर्थ असा आहे की टर्म प्लॅनमध्ये 1 कोटी रुपयांची विमा रक्कम दिली जाते जी पॉलिसीधारकाच्या मृत्यूच्या घटनेत पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला/लाभार्थ्यांना मृत्यू लाभ म्हणून दिली जाते. आकस्मिक परिस्थितीसाठी 8-आकड्यांची रक्कम बाजूला ठेवल्यास, थोडक्यात, तुम्हाला मनःशांती आणि तुमच्या प्रियजनांसाठी पुरेसा आर्थिक बॅकअप मिळू शकतो. रु. 1 कोटी टर्म इन्शुरन्स प्लॅनचे प्रीमियम दर परवडणारे आहेत,ज्यामुळे पॉलिसी खरेदीदारांमध्ये ती एक अनुकूल निवड आहे.

 

जीवनातील अनिश्चिततेच्या काळात, लोक आज त्यांच्या कुटुंबांना अंतिम संरक्षण देण्यासाठी विमा, विशेषतः मुदत विमा खरेदी करण्याकडे वळत आहेत.वाढत्या किमतीच्या या काळात, एखाद्याच्या कुटुंबाकडे आरामात जगण्यासाठी संसाधने आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे. त्यामुळे, तुम्हाला असे दिसून येईल की 1 कोटी रुपयांची सर्वोत्तम मुदत विमा योजना शोधणे ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी एक महत्त्वाची गुंतवणूक असू शकते. बऱ्याच मुदतीच्या विमा पॉलिसींप्रमाणे, तुमचे वय 18 वर्षे असल्यास, तुम्ही 1 कोटी रुपयांची मुदत विमा योजना खरेदी करू शकता. पॉलिसीची कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे आहे.

 

या एक कोटी रुपयांच्या विमा साठी तुम्हाला दर महिन्याला कमीत कमी 450 रुपयांचा हप्ता हा भरावा लागतो. त्या पैशात तुम्ही एक करोडचा इन्शुरन्स काढू शकता.

 

प्रकारे तुम्ही कमी पैशात देखील जास्त रकमेचा विमा काढू शकता.