मित्रांनो, भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासन कडून अनेक योजना राबवण्यात आलेल्या आहेत आणि या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना, आर्थिक दुर्बल स्थिती असणाऱ्यांना, विद्यार्थ्यांना, महिलांना अशा सर्वांना झालेला आहे. आजच्या या लेखामध्ये आपण या महिन्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना आहेत त्या योजनांवरील जे काही पैसे मिळतात. ते पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्या योजना कोणत्या याविषयीची माहिती घेणार आहोत.
त्यातील पहिली योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना.पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 6,000 रुपये जमा केले जातात, जे तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 16 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता 17 वा हप्ता जून महिन्यात जमा केला जाणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होतील. हा निधी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवतो आणि त्यांच्या शेतीशी संबंधित खर्चासाठी उपयुक्त ठरतो.
दुसरी योजना म्हणजे नमो शेतकरी मासन्मान निधी योजना. नमो शेतकरी मासन्मान निधी योजना ही PM किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राबवली जाते. या योजनेतही शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी हप्ते दिले जातात. फेब्रुवारी महिन्यात दुसरा आणि तिसरा हप्ता जमा केला गेला होता. आता चौथा हप्ता जून महिन्यात जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळतील, जे त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी सहाय्यक ठरतील.
तिसरी योजना म्हणजे पीक विमा योजना. राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. पीक विमा योजना या शेतकऱ्यांना या नुकसानीची भरपाई देण्यासाठी आहे. आचारसंहिता संपल्यानंतर, जून महिन्यात, खरीप पीक विमा योजनेअंतर्गत राहिलेल्या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. या भरपाईमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची काहीशी भरपाई मिळेल आणि ते पुन्हा शेती सुरु करण्यास सक्षम होतील.
चौथी योजना जी आहे ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी योजना. या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज दिले जात होते आणि ज्या शेतकऱ्यांचे हप्ते व्यवस्थितरित्या येत आहेत अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची सूट या योजनेमार्फत दिली जाते. तर अशा या योजनेमध्ये अनेक शेतकरी लाभार्थी ठरलेल्या आहेत. परंतु अद्यापही असे कितीतरी शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. अशा वंचित असलेल्या शेतकऱ्यांना या महिन्यांमध्ये या योजना अंतर्गत लाभ हा दिला जाणार आहे.
जून महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीएम किसान सन्मान निधी, नमो शेतकरी मास सन्मान निधी, पीक विमा योजना आणि शेतकरी कर्ज माफी योजना अशा चार योजनांचे पैसे जमा होणार आहेत. या आर्थिक सहाय्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. यामुळे त्यांना त्यांच्या शेतीच्या कामात आणि आर्थिक स्थिरतेत मदत होईल. सरकारच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे जीवन सुलभ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
अशाप्रकारे या चार योजनाद्वारे शेतकऱ्यांना सरकारद्वारे आर्थिक मदत केली जाणार आहे.