Loan : ५० हजारपासून ५ लाखापर्यंत कर्ज : दिव्यांग मुदत कर्ज योजना : वाचा सविस्तर माहिती

Loan : मित्रांनो, भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासन अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात आहे. त्यातीलच एक नवीन निर्णय दिव्यांग व्यक्तींसाठी चालू करण्यात आलेली आहे. दिव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे याकरिता दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून 50 हजारापासून 5 लाखापर्यंत दिव्यांगांना कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. शासनामार्फत नुकताच दिवंगाचा महामंडळ वेगळा करण्यात आलेला असल्यामुळे निधीसुद्धा देण्यात आलेला आहे. याबाबतचे संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

Loan : महाराष्ट्र राज्यातील अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत 03 डिसेंबर 2001 रोजी जागतिक अपंग दिनाचा मुहूर्त साधून महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. राज्यातील बेरोजगार अपंग बांधवांना स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी खूपच कमी दराने (Low Interest Rate) कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. त्याचप्रमाणे अपंगाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना या महामंडळामार्फत राबविल्या जातात.

L&T फायनान्स पर्सनल लोन : 7 लाखांचे अर्जेंट कर्ज उपलब्ध : वाचा हप्ता व कालावधी

या योजनेअंतर्गत कोणत्याही पात्र अपंग व्यक्तीला लघुउद्योग, प्रक्रिया उद्योग, वस्तू उत्पादन उद्योग, गृहउद्योग इत्यादीसाठी अल्प व्याजदराने 50 हजारापासून 05 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं, यामध्ये परतफेडीचा कालावधी 05 वर्ष असून लाभार्थी सहभाग 5% टक्के आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.योजनेच्या प्रमुख अटी व शर्ती आहेत त्या म्हणजे लाभार्थी किमान 40 टक्के अपंग असावा. लाभार्थी किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

आदित्य बिर्ला पर्सनल लोन : २ ते ५० लाखांपर्यंतचे कर्ज ताबडतोब उपलब्ध: जाणून घ्या व्याजदर व हप्ता

लाभार्थ्याचे वय 18 ते 60 वर्ष यादरम्यान असावे. लाभार्थी कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. लाभार्थ्यांनी जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायामधील मूलभूत ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे. कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ज्याप्रमाणे ठरवेल त्याप्रमाणे असतील.

आधार कार्डवरून कर्ज कसे घ्यावे? आधार कर्ज ॲप : कुणालाही कर्ज घेणे सोपे : Aadhar Loan

फक्त आधार कार्ड व पॅन कार्डच्या सहाय्याने अर्जंट कर्ज मिळेल : पहा आता कधी व किती भरायचा ?

Personal Loan : सिबिल स्कोअर नसेल तरी झटपट कर्ज मंजूर ; नव्या पद्धतीची नवीन माहिती

या योजनेसाठी अर्जासाठी आवश्यक कागदपत्र आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, बँकेचा पासबुक, रहिवाशी पुरावा, पासपोर्ट आकाराचे तीन फोटो, कर्जबाजारी नसल्याबाबत ना-देय प्रमाणपत्र, वयाचा दाखला,करत असलेल्या व्यवसायाची माहिती, व्यवसायाची जागा भाड्याने असल्यास 100 च्या बाँडपेपरवर मालकाची संमती, व्यवसायाच्या प्रकल्पाची माहिती, व्यवसाय प्रस्ताव प्रकल्प याव्यतिरिक्त इतर आवश्यक कागदपत्र महामंडळाकडून मागितले जातील.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजनेचा अर्ज कसा व कुठे करावा ? इच्छुक व पात्र अपंग लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळात विहित नमुन्यातील अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करू शकतात.

अशाप्रकारे या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना मदत कर्ज दिले जाते.

कोटक महिंद्रा बँकेतून 3.5 लाखांचे कर्ज कसे घ्यावे? किती हफ्ता भरावा लागेल ? Kotak Mahindra Personal Loan

फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर मिळेल कर्ज : CIBIL नको, Personal Loan: संपूर्ण प्रोसेस माहिती

सिबिल स्कोर नको, कागदपत्रे नको : घ्या 3 लाखाचे Personal Loan : वाचा प्रोसेस आत्ताच

टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.

2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.