रेशन कार्ड वर आता धान्या ऐवजी मिळणार पैसे : सरकारचा मोठा निर्णय : वाचा आत्ताच

मित्रांनो, रेशन कार्ड वर पैसे वितरित करण्यात येणार आहे यासंदर्भात शासनातर्फे एक नवीन जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. ज्या लाभार्थ्यांकडे रेशन कार्ड आहे अशा लाभार्थ्यांना आता पैसे मिळणार आहे. हे पैसे किती मिळणार आहे व यासाठी कोणते लाभार्थी पात्र आहे व काही कागदपत्रांची आवश्यकता आहे का ही संपूर्ण माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

या संदर्भात शासनातर्फे जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. हा जीआर महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या विभागातर्फे निर्गमित करण्यात आलेला आहे. रेशनकार्ड वर पैसे वितरित करण्यात येणार आहे. दिलेल्या जीआर मध्ये एकूण 14 जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहे. 14 जिल्हे कोणते आहे बघा खालील प्रमाणे.

Personal Loan : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101 टक्के झटपट कर्ज मिळणार ; खराब CIBIL स्कोर कर्ज

छत्रपती संभाजीनगर.

जालना.

नांदेड.

बीड.

धाराशीव.

परभणी.

लातूर.

हिंगोली.

अमरावती.

वाशिम.

अकोला.

बुलढाणा.

यवतमाळ.

वर्धा.

हे जिल्हे या ठिकाणी पात्र ठरविण्यात आलेले आहे. यापूर्वी प्रती कुटुंब पाच किलो अन्नधान्य वितरित करण्यात येत होते. ज्यामध्ये गहू आणि तांदूळ यांचा समावेश होता. ज्यामध्ये दोन रुपये प्रति किलो गहू आणि तीन रुपये प्रति किलो तांदूळ याप्रमाणे लाभ दिला जात होता.हे धान्य वितरित करण्यासाठी केंद्र सरकार non NFSA योजनेअंतर्गत गहू हे 22 रुपये प्रति किलो व तांदूळ हे 23 रुपये प्रति किलो या दराने येत होते.

यानंतर गहू व तांदूळ उपलब्ध होणार नाही हे भारतीय अन्य महामंडळाने पत्राद्वारे कळविण्यात आले. यामुळे आता पात्र लाभार्थ्यांना थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा करण्यात यावी हा विचार करण्यात आलेला आहे. जे लाभार्थी पात्र आहे त्यांना 150 रुपये प्रति कुटुंब प्रति लाभार्थी देण्याचे ठरविण्यात आले होते पण यामध्ये दर वाढवण्यात आलेला आहे.

शिक्षण कोणतेही असू द्या, 3000+नोकऱ्या , 5 लाख पॅकेज, लगेच Apply करा !

जे दर वाढून देण्यात येणार आहे हे सन 2024-25 दर वाढवून देण्यात येणार आहे ते रुपये 170 एवढे आहे. ही रक्कम लाभार्थ्यांची बँक मध्ये डीबीटी प्रणाली द्वारे पाठवण्यात जाणार आहे. राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशीव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा हे जिल्हे पात्र आहे.

जे पात्र लाभार्थी आहे त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक फॉर्म भरावा लागणार आहे. हा फॉर्म तुम्हाला जीआर च्या शेवटच्या म्हणजेच पान क्रमांक पाचवर हा फॉर्म तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे.

अशाप्रकारे शासनातर्फे रेशन कार्ड धारकांसाठीचा जीआर निघालेला आहे त्यामध्ये या 14 जिल्ह्यातील लाभार्थ्यांना आता रेशन नाही तर पैसे मिळणार आहेत.