मित्रांनो, आजकाल आधार कार्ड ही एक सर्वांचे गरज बनले आहे. आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे कागद आहेत. कोणत्याही ठिकाणी जर कोणती डॉक्युमेंट नसली तरी चालू शकतात परंतु आधार कार्डही असणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच आज आपण आपल्या मुलांचे आधार कार्ड पाच वर्षानंतर अपडेट करणे आवश्यक आहे. ते अपडेट कसे करावे खर्च किती येईल याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
आधार कार्ड आता आपल्यासाठी उपयुक्त कागदपत्र बनले आहे. आधार जारी करणारी संस्था ‘युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया’ (UIDAI) देखील नवजात मुलांसाठी आधार कार्ड जारी करते. परंतु, येथे आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जर 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलासाठी आधार कार्ड बनविले गेले तर त्यात दोनदा बायोमेट्रिक बदल करावे लागतील. हे अपडेट वयाच्या 5 व्या वर्षी आणि दुसरे 15 व्या वर्षी केले जावे. हे अपडेट करणे अनिवार्य आहे.
रेशन कार्ड वर आता धान्या ऐवजी मिळणार पैसे : सरकारचा मोठा निर्णय : वाचा आत्ताच
युआयडीएआयच्या म्हणण्यानुसार, पालक कोणत्याही सेवा केंद्राला भेट देऊन मुलाचा जन्माचा दाखला म्हणजेच जन्म प्रमाणपत्र किंवा डिस्चार्ज कार्ड / हॉस्पिटलद्वारे जारी केलेल्या स्लिपद्वारे आधार कार्ड बनवू शकतात. युआयडीएआयच्या मते, जेव्हा आपले मूल 5 वर्षांचे असेल तेव्हा त्याचे बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे, मूल 15 वर्षांचे असताना देखील बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे आवश्यक आहे.
Loan : ५० हजारपासून ५ लाखापर्यंत कर्ज : दिव्यांग मुदत कर्ज योजना : वाचा सविस्तर माहिती
ज्या मुलांचे आधार कार्ड 5 वर्षापूर्वी बनलेले आहे त्यांचे बायोमेट्रिक्स म्हणजेच फिंगरप्रिंट्स आणि डोळ्यांची बाहुली विकसित झालेली नसते. म्हणून, अशा लहान मुलांच्या नावनोंदणी दरम्यान त्यांचे बायोमेट्रिक तपशील घेतले जात नाहीत. म्हणूनच, युआयडीएआयने 5 वर्षानंतर हे अपडेट करणे बंधनकारक केले आहे. त्याचप्रमाणे जेव्हा मूल पौगंडावस्थेत प्रवेश करते तेव्हा त्याच्या बायोमेट्रिक पॅरामीटर्समध्ये बदल केले जातात. म्हणूनच, युआयडीएआयने पुन्हा वयाच्या 15 व्या वर्षी बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे आवश्यक केले आहे.
मुलाच्या आधारमध्ये बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे पूर्णपणे विनामूल्य आहे. तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. तसेच, जेव्हा जेव्हा आपण तपशील अपडेटसाठी जाता तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज प्रदान करणे आवश्यक नसते. पालक जवळच्या आधार केंद्रावर जाऊन त्यांच्या मुलाच्या आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक तपशील अपडेट करु शकतात.
10 वी पाससाठी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती; 64 हजार मिळेल पगार, वाचा. सविस्तर!
आपण आपल्या जवळच्या आधार केंद्राची माहिती युआयडीएआय वेबसाइटवरुन मिळवू शकता.आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पत्त्याच्या पुराव्यांकरिता पासपोर्ट, रेशन कार्ड, फोटो ओळखपत्र, मतदान ओळखपत्र, मागील 3 महिन्यांचे वीज बिल, किसान पासबुक, इत्यादी कागदपत्रे ग्राह्य धरली जातात. तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक माहितीत जर बदल करायचा असल्यास आता कुठेही फिरण्याची गरज नाही तुम्ही घरबसल्या हे करु शकता. आधार कार्डवर पत्ता, फोन नंबर, नाव आणि जन्मतारीख अशा गोष्टी ऑनलाइन कशा बदलू शकता ते जाणून घेऊया.
Personal Loan : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101% नवीन झटपट कर्ज: खराब CIBIL स्कोर तरीही मिळेल कर्ज
UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://uidai.gov.in/ आणि “माय आधार” टॅबमधील “अपडेट आधार” पर्यायावर क्लिक करा. अपडेट डेमोग्राफिक्स डेटा ऑनलाइन” या पर्यायवर क्लिक करा. त्यानंतर “अपडेट आधार” विभागाच्या आतील या “अपडेट डेमोग्राफिक्स डेटा ऑनलाइन” या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि स्क्रीनवर दिसणारा सुरक्षा कोड टाका. मग “ओटीपी पाठवा” बटणावर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर वन-टाइम पासवर्ड (OTP) मिळेल.
दिलेल्या जागेत तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP एंटर करा आणि “लॉगिन” बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही करू इच्छित बदलांना समर्थन देणाऱ्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा. म्हणजेच तुम्हाला जी देखील गोष्ट किंवा मजकूर बदलायचा आहे तो योग्य आहे हे दाखवणारे इतर डॉक्यूमेंट्स अपलोड करा. तुम्हाला तुमचा पत्ता अपडेट करायचा असेल तर तुमचा पत्ता पुरावा जसे की लाईट बिल, बँक स्टेटमेंट किंवा पासपोर्ट अपलोड करा. तुम्ही केलेले बदल पुन्हा तपासा आणि माहितीची पडताळणी करा. आता तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
आरसीएफमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता 10 वी पास, वेतन 42 हजार दरमहा!
त्यानंतर स्क्रीनवर येणाऱ्या लिस्टमधून BPO Service ऑप्शन निवडा. BPO Service प्रोव्हाईडर्सला UIDAI द्वारे आधार अपडेटसंबधित रिक्वेस्ट हाताळण्यासाठी अधिकृत केले गेले आहे. ते तुमची माहिती वेरिफाय करती. तुमच्या अपडेट विनंतीची पुष्टी करा आणि “सबमिट” बटणावर क्लिक करा. विनंती सबमिट केल्यानंतर, तुम्हाला युनिक अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) सह पुष्टीकरण मिळेल. तुम्हाला हा URN सांभाळून ठेवावा लागेल कारण याद्वारेच तुम्ही तुमची रिक्वेस्ट ट्रॅक करु शकता. वरील सर्व स्टेप्स झाल्यानंतर ठरावीक काळानंतर तुमची माहिती अपडेट होईल तोवर तुम्ही UIDAI वेबसाइटवर किंवा UIDAI मोबाइल अॅपद्वारे URN वापरून तुमच्या अपडेट विनंतीची स्थिती ट्रॅक करू शकता.
अशाप्रकारे तुमच्या पाच वर्षाच्या मुलाचे आधार कार्ड अपडेट का करावे व घर बसल्या कसा प्रकारे करू शकता. याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेतलेली आहे.