मित्रांनो, भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासनातर्फे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या चालू करण्यात आलेले आहेत. यातील योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, तसेच महिलांसाठी चालू करण्यात आलेला आहे. आजच्या या लेखांमध्ये आपण महाराष्ट्र शासनाने चालू करण्यात आलेल्या महिलांसाठीच्या कोणकोणत्या योजना आहेत? याची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर मिळणार 3 हजार रुपये
1. शक्ती गट नोंदणी (महिला बचत गट)’
या योजनेअंतर्गत लाभ हे महिलांना एकत्रित येऊन प्रशिक्षण घेणे, उद्योग उभारणे व त्यातून आर्थिक उन्नती साधणे या करिता शक्ती गट (बचत गट) स्थापन केली जातात. शक्ती गटांना (बचत गट) विविध शासकीय योजनांचा लाभ मिळू शकतो.
आवश्यक कागदपत्रे म्हणजे, सर्व सदस्यांचे आधार कार्ड, एक फोटो, अध्यक्ष व सचिव यांची नावे
अर्ज कुठे करावा, नजीकची राष्ट्रीयीकृत बँक अथवा जिल्हा धर्मादाय कार्यालय.
2. पंतप्रधान कौशल्य विकास योजना’
आवश्यक कागदपत्रे. आधार कार्ड, एक फोटो, शाळेचा दाखला, मोबाईल क्रमांक.
योजनेचा लाभः १५ ते ४५ वयोगटातील युवती व महिलांना विविध ३३२ प्रकारचे तांत्रिक प्रशिक्षण देणे. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या महिलांना ३ वर्षाकरिता दोन लक्ष रुपयाचा मोफत अपघाती विमा प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना जॅकेट, डायरी, पेन व ओळखपत्र मोफत दिले जाते.
अर्ज हा जिल्हा कौशल विकास अधिकारी किंवा www.pmkvyofficial.org या संकेतस्थळावर.
ऑस्ट्रेलिया स्टडी व्हिसा प्रक्रिया ऑस्ट्रेलिया मध्ये अभ्यास पूर्ण स्पष्टीकरण A ते Z माहिती…
3. चर्मकार समाजातील महिलांना प्रशिक्षण योजना’
योजनेचा लाभः १) शिवणकला २) ब्युटीपार्लर ३) इलेक्ट्रीक वायरमन ४) टर्नर / फिटर ५) मशीनवर स्वेटर विणणे ६) खेळणी बनविणे ७) टी. व्ही/रेडिओ / टेपरेकॉर्डर मेकॅनिक ८) संगणक प्रशिक्षण १) मोटर वाइंडिंग १०) फॅब्रिकेटर / वेल्डींग ११) ऑटोमोबाईल रिपेरिंग (टु व्हीलर, श्री व्हीलर, फोर व्हीलर १२) वाहनचालक १३) चर्मोद्योग पादत्राण उत्पादन १४) चर्मोद्योग चर्मवस्तू उत्पादन यांचे प्रशिक्षण मोफत दिले जाते मोफत प्रशिक्षण व्यतिरिक्त प्रशिक्षणार्थीस दरमहा रु. २५० ते ३०० पर्यंत विद्यावेतन देण्यात येते.
आवश्यक कागदपत्रेः आधार कार्ड, एक फोटो, शाळेचा दाखला, मोबाईल क्रमांक.
अर्ज कुठे करावाः जिल्हा कार्यालय, संत रोहिदास चार्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ किंवा
https://sjsa.maharashtra.gov.in/mr/leather industries-development-corp maharashtra-idcom-mr या संकेतस्थळावर.
4.व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मुलींना विद्यावेतन योजना’
योजनेचा लाभः शासन मान्य संस्थेत नर्सिंग, पॅकींग, टेलीफोन ऑपरेटर, टंकलेखन, संगणक, आयटीआय इ. प्रशिक्षण घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील महिला व मुलीना प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये दरमहा रु.१००/- विद्यावेतन देण्यात येते.
अर्ज कुठे करावा: जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी.
आवश्यक कागदपत्रे – उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, शिधापत्रिकेचा छायाप्रत, प्रशिक्षण संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला.
50 thousand to 3 lakh loans available urgently: 50 हजार ते 3 लाखाचे कर्ज अर्जेंट उपलब्ध:CIBILनको
5.’वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना’
योजनेचा लाभः या योजनेंतर्गत अर्जदारास १० लाखापर्यंत गुंतवणूकीची प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायाकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. यामध्ये राष्ट्रीयकृत बँकेचा सहभाग ६० टक्के असून अर्जदारास ५ टक्के रक्कम स्वतःचा सहभाग म्हणून भरावयाची आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकल्प रकमेच्या ३५ टक्के रक्कम महामंडळामार्फत बीज भांडवल म्हणून देण्यात येते.
‘या’ महिलांना मिळणार 11 हजार रुपये : योजना सुरू !
सदर ३५ टक्के रक्कमेवर दसादशे ४ टक्के व्याज आकारण्यात येते. बीज भांडवल कर्ज योजनेच्या परतफेडीचा कालावधी ५ वर्षाचा असून बँकेने कर्ज वितरित केल्यानंतर त्वरित दुसन्या महिन्यापासून महामंडळाच्या बीज भांडवलाची वसूली सुरु केली जाते. बीज भांडवल वसूली हप्त्याचे आगावू धनादेश घेतले जातात.
आवश्यक कागदपत्रेः
ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारास महत्वाचे चार दस्तावेज अपलोड करणे अनिवार्य असेल.१) आधार कार्ड २) रहिवासी पुरावा ३) उत्पन्नाचा पुरावा – तहसिलदारांनी दिलेले अद्ययावत कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला किंवा अद्ययावत ITR चीप्रत अर्जदारासाठी आणि त्यांच्या / तिच्या पती/ पत्नीसाठी (असल्यास) पती / पत्नीची ITR ची प्रत जोडणे आवश्यक असेल
४) जातीचा पुरावा म्हणून जातीचा दाखला.
अर्ज कुठे करावाः जिल्हा कार्यालय, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ http://mahaswayamrojgar.maharashtra.gov.in/Forms/JobSchermaspx या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा.
6.’रुपये २५,०००/- थेट कर्ज योजना’
योजनेचा लाभः या योजनेंतर्गत छोटया व्यवसायाकरिता रु. २५,०००/- महामंडळाकडून कर्ज दिले जाते. यामध्ये कर्ज वसुलीचा तीन वर्षाचा कालावधी असतो व २ टक्के वार्षिक दर आकारला जातो.
आवश्यक कागदपत्रेः
महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्जदार हा १८ ते ४५ वयाचा असावा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला विमुक्त जाती किंवा भटक्या जमातीचा: 5/28 दाखला. वार्षिक उत्पन्न रुपये १ लाख असल्याचा उत्पन्नाचा दाखला तांत्रिक शिक्षण, प्रशिक्षण घेतल्यास प्राधान्य देण्यात येईल तसे प्रमाणपत्र जोडावे. ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा आहे त्या जागेचा मालकीचा करारपत्र अथवा पुरावा असावा. रेशनकार्ड टेम्पो, रिक्षा व टॅक्सीकरिता परिवहन विभागाकडील परवाना व वाहन चालक परवाना आवश्यक आहे.
अर्ज कुठे करावाः जिल्हा स्तरीय वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती जमाती आर्थिक विकास महामंडळ किंवा http://www.vjnL.in/BeneficiaryRegistrations.aspx?LAN-mr-IN या संकेतस्थळावर.
7.’मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’
योजनेचा लाभः सर्वसाधारण प्रवर्गाकरीता सेवा उद्योगासाठी १५% अनुदान व उत्पादन उद्योगासाठी २५% अनुदान; अनुसूचित जाती / जमाती / महिला / दिव्यांग / माजी सैनिक करीता सेवा उद्योगासाठी २५% व उत्पादन उद्योगासाठी ३५% अनुदान देय असेल. आवश्यक कागदपत्रेः फोटो, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वयाचा दाखला, स्वता चे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र, कर्ज प्रकरणासाठी आवश्यक कागदपत्रे, दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला प्रकल्प अहवाल, बैंक पास बुक विहित नमुन्यातील अर्ज.
अर्ज कुठे करावाः मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम वेबसाईटवर किंवा जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग यांच्या पोर्टलवर.
फोन पे मधून घ्या अर्जंट कर्ज : नवीन बदल, सोपी पद्धत : सर्वांसाठी उपलब्ध
8. प्रधानमंत्री स्वानिधी योजना’
योजनेचा लाभः महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावरील विक्रेते, फेरीवाले, ठेलेवाले व्यावसायिक यांना केवळ ४.८% व्याजदराने १०,००० रुपये कर्ज.
आवश्यक कागदपत्रेः अर्जदाराचा फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, व्यवसाय प्रमाणपत्र, काम करतेवेळी फोटो.
अर्ज कुठे करावाः महानगरपालिका / नगरपालिका / नगरपरिषद कार्यालय.
9. ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’
योजनेचा लाभः महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावरील विक्रेते, फेरीवाले, ठेलेवाले व्यावसायिक यांना केवळ ४.८% व्याजदराने १०,००० रुपये कर्ज.
आवश्यक कागदपत्रेः अर्जदाराचा फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड, बैंक पासबुक झेरॉक्स, व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र, मागील २ वर्षांचा आयकर परतावा, मागील सहा महिन्याचे बैंक स्टेटमेंट प्रकल्प अहवाल.
अर्ज कुठे करावा: आपले बैंक खाते असणाऱ्या किंवा नजीकच्या बँकेत.
10. महिला शेतकरी योजना’
योजनेचा लाभः या योजने अंतर्गत चर्मकार समाजातील ज्या महिलांच्या नावे किंवा पतिपत्नी या दोघांच्या नावावर अथवा पतीच्या नावांवर ७/१२ उतारा आहे व त्या महिला लाभार्थीचा पती प्रतिज्ञा पत्राद्वारे आपल्या पत्नीस शेतीपूरक व्यवसायासाठी या शेतजमिनीच्या नावे कर्ज मंजूर करुन घेण्यास तयार असेल अशा महिला लाभार्थीस रु.५०,००० पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये रु.१०,००० अनुदान व उर्वरित रक्कम रु.४०,००० कर्ज स्वरुपात वार्षिक ५% व्याज दराने मंजूर करण्यांत येते. सदर कर्ज हे फक्त शेतीसाठी अथवा शेतीपूरक व्यवसायासाठीच देण्यात येते.
आवश्यक कागदपत्रेः विहित नमुन्यातील अर्ज उत्पनाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, प्रशिक्षण प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, कच्च्या मालाची दरपत्रके, व्यवसायाच्या जागेसंबंधीची कागदपत्रे, व्यवसायाशी निगडीत परवानगी,दोन जामीनदारांची संमतीपत्रे, अर्जदाराची दोन छायाचित्रे.
अर्ज कुठे करावाः आवश्यक कागदपत्रांसह महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक यांच्या कार्यालयाकडे संपर्क करावा.
11.’बचतगटांसाठी व्याज सवलत योजना’
योजनेचा लाभः महिला बचत गटांना त्यांनी घेतलेल्या कर्जात सुमारे ७ % ची सवलत दिली जाते. त्यामुळे महिला बचत गटांना केवळ ४% इतक्या अल्पदराने कर्ज मिळते.
आवश्यक कागदपत्रेः विहित नमुन्यातील अर्ज बजत गटांच्या सदस्यांची यादी, कर्जाशी संबंधित सर्व कागदपत्रे, कर्ज मुदतीत परतफेड केल्याचा दाखला, एकही हप्ता थकविला नसल्याचे प्रमाणपत्र.
अर्ज कुठे करावाः महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा शाखेकडे करावा. वेब साईट- www.mavimindia.org.
अशा प्रकारच्या अजून अनेक योजना महिलांसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्याची माहिती तुम्हाला नारीशक्ती दूत या ॲपवर मिळेल.