पोलीस दलाच्या मदतीला होमगार्ड धावून येतात. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये होमगार्ड भरती झालेली नाही. अशात आता आगामी सण उत्सव आणि निवडणुकीचा हंगाम पाहता महाराष्ट्र पोलीस दलाला होमगार्डची खूप गरज भासणार आहे. हे पाहता महाराष्ट्र शासनाने इतिहास ऑगस्ट महिन्यापासून होमगार्डची भरती प्रक्रिया राबवण्यास अनुमती दिली आहे. ही भरती सुमारे 9 हजार 700 पदांची साधारणपणे होण्याची शक्यता आहे.
येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर तात्काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही आहेत. याचबरोबर गणपती नवरात्र असे मोठे सण देखील आहेत. यामुळे पोलीस दलावर मोठा ताण पडणार आहे. यामुळे तात्काळ ही भरती करण्यात येणार आहे.
कधीपासून भरती ?
ही होमगार्ड पदांची भरती करून घेण्यासाठी 15 ऑगस्ट पासून ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आणि ज्यावेळी याची सविस्तर जाहिरात येईल त्यावेळी पदसंख्या नमूद करण्यात येणार आहे.
भत्ता किती व कसा मिळणार?
होमगार्ड नियमित काम नसते परंतु सणवार निवडणूक काळात पोलिसांबरोबर त्यांची बंदोबस्तामध्ये नेमणूक केली जाते यावेळी त्यांना प्रत्येक दिवसाला 700 रुपये आणि 100 रुपये उपहार होता म्हणून दिला जातो. तर प्रशिक्षण काळात 35 रुपये खिसा भत्ता आणि शंभर रुपये भोजन भत्ता मिळतो. साप्ताहिक कवायतीसाठी 90 रुपयांचा भत्ता दिला जातो.
आणि इतकेच नाही तर होमगार्डमध्ये तीन वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर पोलीस खात्यामध्ये वन विभागामध्ये अग्निशमन दलात पाच टक्के आरक्षण ही मंजूर करण्यात आली आहे.
यासाठी काय लागेल पात्रता?
यासाठी उमेदवार दहावी पास असणे गरजेचे असते. त्याचे वय 20 ते 50 या दरम्यान असावे. आणि तो जिथून अर्ज करत आहे तेथील पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातीलच असावा. म्हणजेच काय तर स्थानिकांना प्राधान्य राहील.
यासाठी शारीरिक पात्रता पुरुषांसाठी उंची 162 सेंटीमीटर तर महिलांसाठी उंची 150 सेंटीमीटर असावी.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर माहिती येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीसाठीची जेव्हा जाहिरात येईल तेव्हा सविस्तर माहिती येथे आम्ही नमूद करू. तोपर्यंत लागा तयारीला…!