शेतकऱ्यांना उद्याच्या बजेटमध्ये मिळणार खुशखबर; होऊ शकते ‘ही’मोठी घोषणा

ताजी बातमी /ऑनलाईन टीम

 

उद्या 23 जुलै रोजी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण या मोदी सरकारच्या 3.0 कार्यकाळाचा पहिले बजेट सादर करणार आहेत. या बजेटमध्ये भारतीय शेतकऱ्यांना मोठी खुशखबर मिळू शकते.

 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या नुसार केंद्र सरकार किसान सन्माननिधी जो आता दिला जात आहे म्हणजेच वार्षिक शेतकऱ्याला जे सहा हजार रुपये दिले जात आहेत. त्यामध्ये आता मोठी वाढ करण्यात येणार आहे.

 

साधारणपणे ही वाढ 30 टक्क्यांची असून त्यामुळे 80 करोड रुपयांपर्यंत एकूण वाढीमध्ये रक्कम वाढणार आहे यापूर्वी ही रक्कम 60000 करोड रुपये इतकी होती.

 

ही पी एम किसान निधी योजना गत काही वर्षांपासून सुरू असून जून महिन्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये शेतकरी प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना जे वार्षिक सहा हजार रुपये मिळतात त्यात वाढ करावी अशी मागणी केली होती. याबाबत शेतकरी नेते बद्रीनारायण चौधरी यांनी म्हटले आहे की आम्ही सर्व शेतकरी प्रतिनिधींनी मिळणारी सहा हजार रुपये रक्कम वाढवून द्या अशी बरेच दिवस मागणी करत होतो.

 

आता सरकारने याबाबत निर्णय घेतला असून उद्या याबाबतची घोषणा होऊ शकते याचबरोबर महिला तसेच युवकांना आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आणखी काय करता येईल याबाबत ही बजेटमध्ये घोषणा होऊ शकते.