ताजी बातमी/ऑनलाइन टीम
Budget 2024 : नुकताच नव्या सरकारचे म्हणजेच मोदी सरकार 3.0 चे पहिले आर्थिक बजेट सादर करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने शेती, युवावर्ग , महिला तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना बाबत मोठ्या घोषणा करण्यात आली आहे.Budget 2024
आता यामध्ये आपण पाहू की शैक्षणिक कर्जाच्या व्याजाची सवल दिली आहे त्याबद्दल माहिती. प्रतिवर्षी 25 हजार रुपये विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मॉडेल स्किल Model Skill loan लोन योजना सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.
यामध्ये देशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये दहा लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी प्रत्येक वर्षी एक लाख विद्यार्थ्यांना कर्जाच्या रकमेच्या तीन टक्के वार्षिक व्याज सवलती मध्ये थेट दिले जाणार आहे.