मित्रांनो राज्यातील सर्व अशा सेविकांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. अशा सेविका आणि गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेऊन कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू जर झाल्यास त्यांना दहा लाख आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यात येणार आहे.हा निर्णय सरकारने घेतलेला आहे 1 एप्रिल 2024 पासून हा निर्णय लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्य संदर्भात जागरूकता समन्वय प्रोत्साहन निर्माण सुसंवाद करण्याच्या दृष्टीने आशा सेविका व गटप्रवर्तक महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत असतात अशा सेविकांना माता आरोग्य बाला आरोग्य कुटुंब नियोजन इत्यादींसाठी नियमित गृह भेटी देणे.
माता व बालकांना मार्गदर्शन करणे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय येथे पाठवणे अशा प्रकारची कर्तव्य बजावावी लागतात. कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना. अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयांची मदत ही अशा सेविकांना केली जाणार आहे.
यासाठी प्रति वर्ष एक कोटी पाच लाख रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहेत.तसेच आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणी द्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 74 हजार अशा सेविका आणि साडेतीन हजार गटप्रवर्तक यांना याचा लाभ होणार आहे .
यापूर्वी देखील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने आशा सेविकांच्या महिलांना मिळणाऱ्या दरमहा मानधनात पाच हजार रुपयांची वाढ केलेली आहे आणखी दहा लाख रुपयांचा विमा काढण्यात आलेला असून अशा सेविकांमध्ये आनंदाचे वातावरण देखील निर्माण झालेल्या आहे.