Sanjaygandhi Niradhar yojana : संजय गांधी निराधार योजनेची रुपये 3 हजाराची पेन्शन ‘या’ दिवशी जमा होणार

Sanjaygandhi Niradhar Pension yojana :संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन रुपये तीन हजार आता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तर ही पेन्शन कधी जमा होणार आहे. त्याचा तारीख वार वेळ याबाबतची विशेष माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

संजय गांधी निराधार योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी नुकताच म्हणजेच 25 सप्टेंबर 2024 रोजी नवीन जीआर आला आहे. या जीआरमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना रुपये तीन हजार रुपये प्रत्येकाच्या खात्यावर पाठवण्याचे म्हटले आहे.

Personal Loan : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101 टक्के झटपट कर्ज मिळणार ; खराब CIBIL स्कोर कर्ज

Sanjaygandhi Niradhar Pension yojana

तारीख जाणून घेण्यापूर्वी मंत्रिमंडळात याबाबत जो निर्णय झाला तो आधी आता आपण पाहू…

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये १२९,७९,५२,०००/- व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये ५१,८६,८८,०००/- इतकी अर्थसंकल्पिय तरतूद मंजूर करण्यात आली आहे.

Personal Loan : L&T फायनान्स पर्सनल लोन : 7 लाखांचे अर्जेंट कर्ज उपलब्ध : वाचा हप्ता व कालावधी

त्यापैकी संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयान्वये संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये ६१,६९,१०,९६०/- व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये २४,८४,६१,७२०/- इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरीत करण्यात आलेला आहे.

आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये १०,०५,१५,५६०/- (रुपये दहा कोटी पाच लक्ष पंधरा हजार पाचशे साठ फक्त) व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये ४,१२,१९,४००/- (रुपये चार कोटी बारा लक्ष एकोणावीस हजार चारशे फक्त) इतका निधी बिम्स प्रणालीवर वितरीत केला आहे. सदरहू निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर, २०२४ या कालावधी करिता चा आहे.

तर हा निधी म्हणजेच संजय गांधी निराधार योजनेच्या पैसे वाटपाची तारीख आता प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी गेल्याच महिन्यात दिले आहेत. त्यामुळे येथे 5 ऑक्टोंबर च्या दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. असे कळते.