Ration Card Holder Scheme : या रेशन कार्डधारकांना मिळणार 9 हजार रुपये : पहा सविस्तर

Ration Card Holder Scheme :रेशन कार्डधारकांना आता मोठी खुशखबर मिळाली आहे. रेशन कार्ड धारकांच्या खात्यात आता नऊ हजार रुपये जमा होणार आहेत. या योजनेचा राज्यातील सुमारे 40 लाखाहून अधिक शिधापत्रिकाधारकांना लाभ होणार आहे.

Ration Card Holder Scheme :
आतापर्यंत रेशन कार्डधारकांना रेशन दुकानातून विविध प्रकारचे धान्य वितरित करण्यात येत होते. यामध्ये गहू डाळी तांदूळ याचे वितरण करण्यात येत होते. यामध्ये धान्याचा अल्प पुरवठा, नासाडी गळती, रेशन दुकानदारांकडून चुकीची वागणूक, याचबरोबर लांबच लांब रांगेत उभा राहून वेळ खर्च करून धान्य आणण्यासाठी त्रस्तत राहावे लागत आहे.

या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र सरकारने एक मोठा धाडसी निर्णय घेतला असून आता शिधापत्रिका धारकाच्या खात्यात थेट नऊ हजार रुपये महाराष्ट्र सरकार पाठवणार आहे. या पैशाचा उपयोग या शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या गरजेनुसार करता येणार आहे.

ज्या कोणाला धान्य घ्यायचे असेल तर त्यासाठी वापर करतील. ज्या कोणाला वैद्यकीय खर्च करायचा असेल तर ते वैद्यकीय खर्चासाठी पैसे खर्च करतील तर कोणाला शैक्षणिक कार्यासाठी पैसे वापरायचे असतील तर हे सरकार द्वारे मिळणारे नऊ हजार रुपये शैक्षणिक कार्यासाठी ती कुटुंब वापरू शकेल अशी व्यवस्था याद्वारे करण्यात येणार आहे.

या योजनेमुळे अशा सर्वच गोष्टींवर आता शिधापत्रिकाधारकांना स्वातंत्र्य मिळणार असल्याने ही योजना खरोखरच सर्वसामान्य कुटुंबाच्या फायद्याची ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले आहे.

या योजनेमुळे या कुटुंबातील सर्वांनाच एक विशेष सन्मान मिळेल आणि या कुटुंबांकडे अनेक पर्याय उभे राहू शकतील त्यामुळे अशा कुटुंबातील प्रत्येक गोरगरीब व्यक्ती सर्व दृष्टीने समृद्ध होईल असे मत सरकारचे बनले आहे. यामुळे ही योजना लागू करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.