Credit Card Application : हल्लीच्या काळात क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या फार मोठी झाली आहे. कारण जरी तुमच्याकडे पैसे नसले तरी तुम्ही हव्या त्यावेळी हवेच्या वस्तू तात्काळ खरेदी करू शकता. आणि कार्डच्या मुक्ती प्रमाणे पैसे भरून त्याची पूर्तता करू शकता. त्यामुळेच क्रेडिट कार्ड ही संकल्पना हल्लीच्या काळात चांगली रुजू लागली आहे.
पण हे क्रेडिट कार्ड जर तुम्हाला घ्यायचे असेल तर यासाठी तुम्हाला तुमचा सिव्हिल स्कोर हा अत्यंत चांगला लागतो तरच तुम्हाला कोणतीही बँक क्रेडिट कार्ड देते अन्यथा तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळत नाही.
क्रेडिट कार्डचा एक भाग आपण आता पाहू तो म्हणजे सुरक्षा क्रेडिट कार्ड-
Credit Card Application : सुरक्षा क्रेडिट कार्ड हे आपली बँकेमध्ये असेल तरच दिले जाते आणि जेवढी तुमची एफडी असेल त्यातील 85 टक्के रक्कम तुम्हाला या क्रेडिट कार्डद्वारे वापरण्याची मुभा दिली जाते. म्हणून याला सुरक्षा क्रेडिट कार्ड असे म्हटले जाते. या सुरक्षित क्रेडिट कार्ड मध्ये एफडी बँकेमध्ये असते.
आणि ग्राहक या कार्डचा वापर करू शकतात मात्र याची बिल देखील वेळच्यावेळी भरावे लागते. समजा जर या क्रेडिट कार्डचे बिल वेळच्या वेळी नाही भरले तर यासाठी एक्स्ट्रा चार्जेस लावले जातात. आणि तुमचा सिबिल स्कोर देखील खराब होतो.
तर यासाठी लक्षात घ्या की आपणाला सुरक्षित क्रेडिट कार्ड जर वापरायचे असेल तर तत्पूर्वी आपणाला यापुढे ची काही रक्कम बँकेत भरावी लागेल आणि वेळच्या वेळी क्रेडिट कार्डची बिल जमा करावे लागेल तरच तुम्ही सुरक्षित क्रेडिट कार्ड वापरू शकता.
मित्रांनो तुमच्या एफडीची रक्कम इतकी जास्त तितकीच तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा देखील जास्त मिळू शकते हे तुम्ही लक्षात घ्या. सुरक्षित क्रेडिट कार्ड वापरताना तुम्हाला तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा कोणत्याही प्रकारचा पुरावा द्यावा लागत नाही. तसेच सुरक्षित क्रेडिट कार्ड वापरणारे व्यक्तीला त्याच्या खर्चा व्यतिरिक्त मर्यादा देखील असतात.