रिझर्व बँकेची नुकताच एक मॉनिटरी पॉलिसीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये स्मॉल फायनान्स द्वारे ग्राहकांना छोट्यातील छोटी कर्जे तसेच काही मोठी कर्जे सहज यांना कसं सोपं होईल याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला.
Mudra Loan : मुद्रा कर्ज योजनेत बदल : आता मिळणार 20 लाखांपर्यंत कर्ज
लोकांना आता UPI सुविधेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होणार असून, याआधी हि सुविधा फक्त शेड्युल्ड कमर्शियल बँकांसाठी मर्यादित होती. पण या झालेल्या बैठकीत स्मॉल फायनान्स बँकांनाही हि सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे लहान बँकांमध्ये खाते असलेल्या लोकांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
सप्टेंबर 2023 रोजी UPI च्या माध्यमातून कर्ज मिळवण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. यामध्ये ग्राहकांना BHIM, Paytm, GPay, PayZapp यासारख्या अँपच्या माध्यमातून सहज कर्ज घेता येते. ग्राहकांसाठी आधीच क्रेडिट लिमिट निश्चित केली जाते आणि त्यानंतर ग्राहक सुलभपणे UPI चा वापर करून कर्ज घेऊ शकतात. या सर्वामध्ये नेशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) महत्वाची भूमिका बजावताना दिसते.
ग्राहकांचे क्रेडिट प्रोफाईल पाहून स्मॉल फायनान्स बँक आणि इतर वित्तीय संस्थांद्वारे क्रेडिट लाईन निश्चित केली जाते. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील लोकांना तसेच शहरी भागातील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण या निर्णयामुळे लोकांना सहज कर्ज उपलब्ध होणार असून, वित्तीय समावेशनाला चालना मिळणार आहे.
Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती
UPI सुविधेद्वारे कर्ज घेण्याच्या प्रक्रियेमुळे ग्राहकांना कमी वेळेत कर्ज मिळते. पारंपरिक कर्ज प्रक्रियेच्या तुलनेत ही प्रक्रिया जलद आणि सुलभ आहे. मात्र डिजिटल बँकिंग सुविधांचा वापर करताना ग्राहकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण डिजिटल फसवणुकीचे प्रमाणही वाढत आहे. RBI च्या या निर्णयामुळे अधिकाधिक लोकांना बँकिंग सेवांच्या कक्षेत आणले जाईल. लहान बँकांमध्ये खाते असलेल्या लोकांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.