Low Cibil Score: सिबिल स्कोअर खराब असला तरीही ‘या’ प्रकारे तुम्हाला अर्जंट कर्ज मिळते : पहा माहिती

 Low Cibil Score: आजकाल कोणत्याही प्रकारची कर्ज घ्यायची झाले तर आधी CIBIL Score प्रमाण मानला जातो. तुमचा सिव्हिल स्कोर कसा आहे यावर तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही आणि द्यायची झाली तर किती द्यायचे याबाबत बँका तसेच फायनान्स कंपनी एक प्रमाण बांधतात. आणि याद्वारे तुमची पूर्तता करत असतात.

मात्र जर तुमचा सिव्हिल स्कोर खराब असेल तर तुम्हाला बँका तसेच फायनान्स कंपन्या अनेक वेळा कर्ज देण्यास नाकारतात. मग अशावेळी काय करायचं याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी आम्ही खालील प्रमाणे वेगवेगळे पाच पर्याय सांगत आहोत यातील कोणता पर्याय आपल्यासाठी उपयोगी पडेल त्याप्रमाणे आपण त्याचा वापर करून आपल्याला हवे तेवढे कर्ज घेऊ शकता.

Personal Loan : 5 मिनिटात 10 लाखांचे पर्सनल लोन : IDFC फर्स्ट बँकेची विशेष योजना : जाणून घ्या माहिती

1. जॉईंट लोन Joint Loan : समजा तुमची आर्थिक उत्पन्न चांगले आहे. आणि सिबिल स्कोर खराब आहे अशावेळी तुम्ही या जॉईंट लोनचा वापर करून कर्ज मिळू शकतात. यामध्ये तुमचा जॉईंट होल्डर जो चांगला असेल तर त्याच्या आधारे तुम्हाला चांगले कर्ज मिळू शकते. मात्र त्याचा सिव्हिल स्कोर चांगला पाहिजे.

Personal loan : कोटक महिंद्रा बँक देत आहे झटपट पर्सनल लोन : उत्पन्नाची अट नाही : कोणालाही अर्जंट मिळते

2. गोल्ड लोन : Gold loan: जर तुमच्याकडे सोने असेल, तर त्याच्या बदल्यात तुम्ही कर्ज घेऊ शकता. Gold Loan हे Secured Loan च्या श्रेणीत येते. तुम्हाला सोन्याच्या सध्याच्या किमतीच्या 75% पर्यंत कर्ज मिळू शकते. यासाठी फारशी कागदपत्रांची गरज नसते आणि तुमच्या सिबिल स्कोअरचा विचार केला जात नाही. तुमचे सोने गहाण ठेवून हे कर्ज दिले जाते.

3. ऍडव्हान्स सॅलरी लोन : काही कंपन्या Advance Salary Loan देतात. हे कर्ज तुमच्या पगाराच्या तीनपट पर्यंत असू शकते. Advance Salary Loan चा एक फायदा म्हणजे यासाठी फारशी कागदपत्रे लागणार नाहीत. हे कर्ज एका प्रकारचे Personal Loan असते, जे तुम्हाला सहज मिळते आणि ते तुम्ही निश्चित कालावधीत EMI च्या माध्यमातून फेडू शकता. सामान्यतः हे कर्ज 15 वर्षांच्या आत फेडायचे असते.

Bajaj Finance personal loan :  बजाज फायनान्स पर्सनल लोन कसे घ्यावे? वाचा सविस्तर 

एन बी एफ सी : जर तुमचा सिबिल स्कोअर खराब असेल, बँक कर्ज देत नसेल आणि तुम्हाला तातडीने पैशांची गरज असेल, तर तुम्ही NBFC कडे अर्ज करू शकता. येथे कमी सिबिल स्कोअर असतानाही कर्ज मिळू शकते. मात्र, बँकेच्या तुलनेत येथे व्याजदर जास्त असू शकतो.

लोन ओन डिपॉझिट स्कीम : जर तुमच्याकडे कोणती FD असेल किंवा LIC किंवा PPF सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल, तर त्याच्या बदल्यातही तुम्ही कर्ज घेऊ शकता. या कर्जासाठी तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेचा आधार घेतला जातो. हे कर्ज परतफेडीसाठी ठराविक कालावधीत फेडायचे असते. जर तुमचे PPF खाते किमान एक आर्थिक वर्ष जुने असेल, तर तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता. या खात्यावर पाच वर्षांपर्यंत कर्जाची सुविधा मिळू शकते. त्यानंतर, आंशिक रकमेची परतफेड करण्याची सुविधा दिली जाते.