PM Awas: स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. या घराबाबत अनेकांची अनेक स्वप्ने देखील असतात. मात्र याबाबतचा खर्च आणि आर्थिक बजेट पाहता ही मोठी गोष्ट असल्याचे मानण्यात येते. याच गोष्टीचा विचार करत सर्वसामान्याला आपल्या हक्काचं घर व्हावं, यासाठी सरकार कार्यरत आहे.
पीएम आवास योजनेअंतर्गत घरांची उपलब्धता करून दिली जात आहे यासाठी विशेष अशी सवलत आवास योजनेद्वारे दिली जात आहे. यातील काही जाचक अटी तसेच नियमांमुळे अनेकांना या योजनेपासून वंचित राहावं लागत होतं. मात्र आता बऱ्याचशा अटी शिथिल केल्याने आता सर्वसामान्य स्वतःचे घर करणे सोपे होणार आहे.
Mudra Loan : मुद्रा कर्ज योजनेत बदल : आता मिळणार 20 लाखांपर्यंत कर्ज
महाराष्ट्रात केंद्र सरकार आता सहा लाख 36 हजार पर्यंतची घरे नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे.अनेक निकषांमुळे गरीब लोकांना घरे मिळत नव्हती. परंतु आता सरकारने या योजनेसाठी पात्रतेचे निकष शिथिल केलेले आहेत. त्यामुळे यावर्षी महाराष्ट्रात जवळ 20 लाख घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
याबाबतची माहिती केंद्रीय कृषी आणि ग्राम विकास मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी केलेली आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख संस्थेचे संचालक एस के रॉय देखील उपस्थित होते.
याआधी फोन तसेच दुचाकी असलेल्यांना घरी मिळत नव्हती. परंतु आता अशा लोकांना देखील घरी मिळणार आहेत. तसेच ज्या लोकांचे दरमहा उत्पन्न दहा हजार रुपये असायचे त्यांना या योजनेत समावेश केला जात नव्हता.
Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती
आता ही मर्यादा 15000 रुपये प्रति महिना एवढी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 5 एकर कोरडवाहू आणि अडीच एकर बागायती शेती असलेल्या शेतकऱ्यांना देखील ही योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आलेला आहे.
Ladki Gruhsevika Yojana : लाडकी गृहसेविका योजना :घरकाम करणाऱ्या महिलांना 10 हजारांचा लाभ?