दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी आता नवीन एक खुशखबर मिळाली आहे ती म्हणजे 2771 पदांची होमगार्ड भरती आता होणार आहे. ही होती बृहन्मुंबई महापालिका येथे होणार आहे.
Personal Loan : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101% नवीन झटपट कर्ज: खराब CIBIL स्कोर तरीही मिळेल कर्ज
बृहन्मुंबईमधील रिक्त असलेल्या पुरुष व महिला होमगार्डच्या २७७१ जागा भरण्यात येणार आहेत. महानगरपालिकेकडून २७७१ होम गार्ड पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झाली असून सदर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी उमेदवारांना 10 जानेवारी पर्यंत अर्ज करावा असे कळविण्यात आले आहे.
यासाठी पात्रता खालीलप्रमाणे असेल –
शैक्षणिक पात्रता कमीत कमी १० वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. उमेदवाराची उंची ही पुरुषांकरता १६२ सेमी महिलांकरता १५० सेमी गरजेची आहे. छाती- (फक्त पुरुष उमेदवारांकरता)- न फुगविता किमान ७६ सेमी गरजेची असते
एकूण २७७१ पदांवर भरती केली जाणार आहे.
जाहिरातीनुसार २० ते ५० वर्ष वय देण्यात आले आहे
कागदपत्रे खालील प्रमाणे
रहिवासी प्रमाणपत्र
शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र (10वीचे प्रमाणपत्र)
जन्मतारखेचा पुरावा
शाळा सोडल्याचा दाखला
३ महिन्याच्या आतील पोलिस चारित्र्य प्रमाणपत्र
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम BMC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. नंतर ऑनलाइन पद्धतीने सविस्तर माहिती भरून अर्ज करावा लागेल. अर्जाची अंतिम तारीख ही १० जानेवारी २०२५ असणार आहे.
होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक, नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती व अर्ज https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1/php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी होमगार्डमध्ये सेवा करु इच्छिणाऱ्या बृहन्मुंबईतील उमेदवारांनी नोंदणीकरीता अर्ज करावा.