तुम्हाला कोट्यधीश व्हायचं आहे का? अर्थातच कोण नाही म्हणणार. आता हे शक्य आहे. त्यासाठी फक्त थोडी गुंतवणूक करावी लागेल. ती देखील अगदी कमी रक्कम तेही दर महिन्याला, एकदम मोठ्या रकमेची गुंतवणूक करायची नाही. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. आता तुम्ही कोट्यधीश कसे व्हाल, याविषयी पुढे जाणून घ्या.
प्रत्येक व्यक्तीने मासिक उत्पन्नातील काही भाग वाचवून चांगल्या योजनेत गुंतवणूक केली पाहिजे. चांगल्या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. तुम्ही एकत्र चांगला नफा देखील कमवू शकता. गुंतवणुकीसाठी लोकांमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
अनेक जण पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात, तर अनेक जण बँक FD मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. त्याचबरोबर म्युच्युअल फंड SIP मधील गुंतवणूक लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे.
म्युच्युअल फंड SIP गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय
आजकाल अनेक जण म्युच्युअल फंड SIP मध्ये पैसे गुंतवणे पसंत करत आहेत. यामध्ये तुम्ही तुमचे पैसे SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवता. दुसरीकडे म्युच्युअल फंड SIP मध्ये दीर्घकाळ नियमित गुंतवणूक केल्यास कोट्यवधी रुपयांचा फंडही गोळा होऊ शकतो. म्युच्युअल फंड SIP मध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त 12 टक्के परतावा मिळतो. ही मार्केट लिंक्ड स्कीम आहे. अशावेळी बाजारानुसार परतावाही चढ-उतार होऊ शकतो.
5000 च्या SIP मुळे इतक्या वर्षात 1 कोटींचा फंड
तुम्ही म्युच्युअल फंड SIP मध्ये दीर्घकाळासाठी दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही 1 कोटी रुपयांपर्यंतचा फंड गोळा करू शकता. यासाठी तुम्हाला सलग 27 वर्ष दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही सलग 27 वर्ष दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही एकूण 16,20,000 रुपयांची गुंतवणूक कराल. 12 टक्के दराने तुम्हाला 27 वर्षांनंतर एकूण 1,08,11,565 रुपयांचा निधी मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला एकूण 91,91,565 रुपयांचा नफा होईल.
op-Up SIP सामान्य SIP पेक्षा वेगळी असते. Top-Up SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल. खरं तर Top-Up SIP मध्ये तुम्हाला दर महा 10 टक्के दराने आपली SIP वाढवावी लागते.
दरमहा 10,000 SIP मध्ये गुंतवणूक करा
जर तुम्ही SIP मध्ये सलग 20 वर्ष दरमहा 10,000 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही SIP मध्ये एकूण 24 लाख रुपयांची गुंतवणूक कराल. जर तुम्हाला 12 टक्के परतावा मिळाला तर तुम्हाला 20 वर्षांनंतर एकूण 99.91 लाख रुपये मिळतील. यामध्ये तुम्हाला 75.91 लाख रुपयांचा नफा मिळेल.