पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना याअंतर्गत २ दुधाळ गाई, म्हैस वाटप योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. अर्जदारांसाठी योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत दि.३ मे 2025 ते २ जून 2025 पर्यंत राहील. योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी ah.mahabms.com हे संकेतस्थळ आणि AH-MAHABMS हे मोबाइल ऍप्लिकेशन उपलब्ध करण्यात आलेले आहे.
दि. 03.05.2025 ते 02.06.2025 या कालावधीमध्ये यापूर्वी अर्ज न केलेल्या नविन लाभार्थ्यांना फक्त नोंदणी आणि अर्ज करता येणार आहे. लाभार्थ्यांना योजनेच्या पुढील टप्प्यात वेळापत्रकानुसार कागदपत्रे अपलोड करण्यासाठी स्वतंत्र कालावधी देण्यात येईल. अर्जदारांनी अर्ज करताना त्यांची सर्व वैयक्तिक माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. परंतु, अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरताना काही चूक झाल्यास त्यास अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल. परंतु, ही सुविधा फक्त या वर्षी अर्ज करण्याऱ्या नविन लाभार्थ्यांनाच उपलब्ध होईल. सन २०२१-२२, २०२२-२३ किंवा २०२३-२४ मध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.
महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना उपरोक्त योजना लागू नाहीत. केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाश्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. सन २०२१-२२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची प्रतिक्षाधीन यादी यादी पुढील ५ वर्ष ग्राह्य म्हणजेच सन २०२५-२६ पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.
सन २०२१-२२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना प्रतिक्षाधीन यादी प्रमाणे सर्वप्रथम लाभ देण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी. त्यानंतर सन २०२२-२३ पासून प्रत्येक वर्षी नविन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यापूर्वीच्या प्रतिक्षाधीन यादीतील शेवटच्या अर्जदारानंतर ग्राहय धरण्यात येईल. या योजनेमध्ये अर्जदार लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ हा त्यांचा यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उपलब्ध निधीच्या अधिन राहून देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. यापूर्वी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्याची आवश्यकता नाही.
योजने अंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या वेळापत्रकानुसार वेळोवेळी SMS प्राप्त होतील. योजने अंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर बंधपत्र लाभार्थीने देणे बंधनकारक राहील. योजने संदर्भात अधिक माहिती करिता योजनेचा तपशील आणि वेळापत्रक पहावे. कॉल सेंटर संपर्क – 1962 (7AM to 6PM).
पशुसंवर्धन विभागाकडुन राबविण्यात येत असलेल्या विविध वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या योजनेतील दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. दि. ३१ जानेवारी, २०२३ रोजी पार पडलेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने विविध दुधाळ जनावरे गट वाटप योजनेत वाटप करावयाच्या प्रति गायीची किंमत रु.७०,०००/- व प्रति म्हशीची किंमत रु. ८०,०००/- करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केलेली आहे.
सदरची योजना सद्यःस्थिती वाचा येथील अ.क्र. १ ते ०९ येथे नमुद सर्व शासन निर्णय, शुध्दीपत्रक, शासन पूरकपत्र व पत्रांमधील मार्गदर्शक तत्वे / सुचना विचारात घेवून राबविण्यात येत आहे. सदरच्या सर्व शासन निर्णय, शुध्दीपत्रक, शासन पूरकपत्र व पत्रांमधील मार्गदर्शक तत्वे / सुचनांचा अंर्तभाव करुन योजनेची अंमलबजावणी सुकर होण्यासाठी सर्वसमावेशक शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. त्याअनुषंगाने, वाचा येथील अ.क्र.१ ते ९ येथील सर्व शासन निर्णय, शुध्दीपत्रक, शासन पूरकपत्र व पत्र अधिक्रमित करुन खालीलप्रमाणे सर्वसमावेशक शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
योजनेचे नाव – दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे .
संकरित गाय – एच.एफ. / जर्सी म्हैस – मुऱ्हा / जाफराबादी
देशी गाय – गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी
• लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१. महिला बचत गट (अ.क्र. २ ते ३ मधील )
२. अल्प भूधारक (१ हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक )
३. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोंद असलेले )
एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.
एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.
अ.क्र. बाब २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात ) अ.क्र. बाब २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )
१ संकरित गाई चा गट – प्रति गाय रु. ७०,०००/- प्रमाणे १,४०,००० १ म्हशी चा गट – प्रति म्हैस रु. ८०,०००/- प्रमाणे १,६०,०००
२ जनावरांसाठी गोठा ० २ जनावरांसाठी गोठा ०
३ स्वयंचलित चारा कटाई यंत्र ० ३ स्वयंचलित चारा कटाई यंत्र ०
४ खाद्य साठविण्यासाठी शेड ० ४ खाद्य साठविण्यासाठी शेड ०
५ १०.२० टक्के (अधिक १८ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा १६,८५० ५ १०.२० टक्के (अधिक १८ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा विमा १९,२५८
एकूण प्रकल्प किंमत १,५६,८५० एकूण प्रकल्प किंमत १,७९,२५८
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
अ.क्र. प्रवर्ग २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात) अ.क्र. प्रवर्ग २ जनावरांचा गट (रक्कम रुपयात)
१ शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के १,१७,६३८ १ शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के १,३४,४४३
१ स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के ३९,२१२ १ स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के ४४,८१५
२ शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के ७८,४२५ २ शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के ८९,६२९
२ स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के ७८,४२५ २ स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के ८९,६२९
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –
१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
२) * सातबारा (अनिवार्य)
३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
४) * अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
५) * आधारकार्ड (अनिवार्य )
६) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
७) * अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत