महाराष्ट्रातील विद्युत विभागात नोकरीची संधी; कसं कराल अप्लाय? जाणून घ्या, पात्रता आणि संपूर्ण माहिती

ITI (आयटीआय) मध्ये शिक्षण घेतलेले बरेचसे तरुण नोकरीच्या शोधात असल्याचं पाहायला मिळतं. अशा तरुणांसाठी विद्युत विभागातील नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड (MSEDCL) कडून महाराष्ट्रातील तरुणांसाठी 249 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

 

ही भरती इलेक्ट्रिशियन, वायरमॅन आणि सीओपीए सारख्या ट्रेड्समध्ये केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार mahadiscom.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 10 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

 

किती पदांसाठी भरती?

 

एकूण पदांची संख्या: 249

इलेक्ट्रिशियन पदासाठी जागा: 110

वायरमॅन: 109

सीओपीए (COPA): 30

काय आहे पात्रता?

 

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून संबंधित ट्रेड्समध्ये आयटीआय (ITI) ची डिग्री असणं अनिवार्य आहे.

 

वयोमर्यादा

 

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 27 वर्षे असणं आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

 

निवड प्रक्रिया

 

या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारे केली जाणार आहे. यासाठी कोणतीच लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. केवळ शैक्षणिक गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे.

 

डॉक्यूमेंट्स व्हेरिफिकेशन कधी होणार?

 

21 जून ते 23 जून 2025 दरम्यान उमेदवारांचे डॉक्यूमेंट्स तपासले जातील. त्यामुळे उमेदवारांनी सर्वप्रथम स्वत:चे डॉक्यूमेंट्स जसे की, आयटीआय (ITI) प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, जातीचा दाखला (लागू असल्यास) आणि रहिवासी प्रमाणपत्र तयार ठेवणे आवश्यक आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

 

कसा कराल अर्ज?

 

1. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम mahadiscom.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

 

2. यानंतर होमपेजवरील ‘Career’ किंवा ‘Apprenticeship’ या सेक्शनमध्ये जा.

 

3. या भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन अगदी लक्षपूर्वक वाचा.

 

4. यानंतर भरतीचा अर्ज भरा आणि आवश्यक डॉक्यूमेंट्स अपलोड करा.

 

5. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ती सुरक्षितरित्या ठेवा.