युनियन बँकेत नोकरीची संधी, मिळणार भरघोस पगार, अर्ज कसा करावा?

सरकारी बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे.यूनियन बँकेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. यूनियन बँकेत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. ऑफिस असिस्टंट, अटेंडरसह इतर अनेक पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

 

यूनियन बँकेतील या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जुलै आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीबाबत सर्व माहिती unionbankofindia.co.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

 

यूनियन बँकेतील या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा २२ ते ४० वर्षे असावी. या वयोगटातील उमेदवारांनीच अर्ज करावेत. (Union Bank Job)

 

पात्रता

 

फॅकल्टी पदासाठी उमेदवाराने ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे. ऑफिस असिस्टंट पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट असावे. याचसोबत कॉम्प्युटरचे ज्ञान असावे. अटेंडर पदासाठी १०वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. माळी पदासाठी ७वी पास उमेदवार अर्ज करु शकतात.

 

पगार

 

फॅकल्टी असिस्टंट पदासाठी ३०,००० रुपये पगार मिळणार आहे. ऑफिसर असिस्टंट पदासाठी २०,००० रुपये पगार मिळणार आहे. अटेंडर पदासाठी १४००० रुपये पगार मिळणार आहे. माळी पदासाठी १२,००० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

 

युनियन बँक ही सरकारी बँक आहे. त्यामुळे या बँकेत नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला खूप चांगला पगार मिळणार आहे. तसेच हा अनुभव तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. भविष्यात तुम्ही कधी दुसरीकडे नोकरीसाठी गेलात तर तुम्हाला खूप फायदा होईल.