बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी; 2500 जागांसाठी भरती जाहीर
पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालेले आणि बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. देशातील नामांकित बँकेपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदा मध्ये तब्बल २५०० जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. हि भरती विविध राज्यात केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी यामध्ये ४८५ रिक्त पदे भरली जातील. या नोकरी साठी शैक्षणिक पात्रता काय आहे? अर्ज कसा आणि कुठे भरायचा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात…..
कोणत्या पदासाठी भरती ?
बँक ऑफ बडोदाची हि नोकरभरती (Bank of Baroda Recruitment 2025) लोकल बँक ऑफिसर या पदासाठी होणार आहे. यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार २४ जुलै २०२५ पर्यंत अधिकृत वेबसाइट: bankofbaroda.in वर अर्ज करू शकतात.
पात्रता काय? Bank of Baroda Recruitment 2025
पात्रता निकषांमध्ये उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, वयोमर्यादा, भाषा प्रवीणता आणि CIBIL स्कोअर यांसारख्या गोष्टी तपासल्या जातील. शैक्षणि पात्रतेबद्दल सांगायचं झाल्यास,
) उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण केलेली असावी.
२) ज्या उमेदवारांकडे चार्टर्ड अकाउंट्ट, कॉस्ट अकाउंटंट, इंजिनियरिंग किंवा मेडिकल विषयात पदवी प्राप्त केलेली असेल ते उमेदवार सुद्धा अर्ज करु शकतात.
) या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे १ वर्षाचा कामाचा अनुभव असावा.
४) उमेदवाराने कमर्शियल बँक, रिजनल रुरल बँक, को-ऑपरेटिव्ह बँकेत काम केलेले असावे.
५) सदर उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असावे.
अर्ज शुल्क –
सामान्य, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि इतर मागासवर्गीय श्रेणीतील अर्जदारांना ८५० रुपये शुल्क भरावे लागेल, तर अनुसूचित जाती, जमाती, अपंग, ईएसएम आणि महिला उमेदवारांना १७५ रुपये शुल्क लागू होते.
अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या: bankofbaroda.in
उपलब्ध असलेल्या बँक ऑफ बडोदा LBO नोंदणी २०२५ लिंकवर क्लिक करा
नोंदणी पूर्ण करा आणि नंतर लॉगिन करा
आता अर्ज फॉर्म भरा (Bank of Baroda Recruitment 2025)
कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क भरा
फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट काढा.