10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी; असा करा अर्ज

10 वी १२ वी, आणि ITI उत्तीर्ण विध्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे विभागात तब्बल ६२३८ पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. यातील तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल या पदासाठी १८३ जागा तर तंत्रज्ञ ग्रेड III या पदासाठी ६०५५ जागा भरण्यात येतील. या भरतीसाठी 28 जून 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025 आहे. या भरतीसाठी अर्ज कसा करायचा? शैक्षणिक पात्रता काय आहे? शुल्क किती आहेत? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

 

शैक्षणिक पात्रता?

रेल्वे भरतीसाठी तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल या पदासाठी (Indian Railways Recruitment 2025) देशातील कोणत्याही विद्यापिठातून Diploma, किंवा B.Sc, BE/ B.Tech हि पदवी पास असलेल्या उमेदवाराला या परीक्षेसाठी बसला येईल… तर तंत्रज्ञ ग्रेड III या पदासाठी 10th, ITI, 12th वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना पात्र ग्राह्य धरले जाईल.

 

वयोमर्यादा – Indian Railways Recruitment 2025

टेक्निशियन ग्रेड-१ सिग्नल पदासाठी उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ३३ वर्षे असले पाहिजे. तर टेक्निशियन ग्रेड ३ पदासाठी उमेदवारांचे वय १८-३० वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल

 

वेतन किती?

तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल या पोस्टसाठी महिन्याला हे साधारणतः 29,200 हजार रुपये इतके वेतन असेल तर, तंत्रज्ञ ग्रेड II| या पदासाठी साधारणतः महिन्याला 19,900 हजार पगार मिळू शकतो.

 

परीक्षा शुल्क किती?

परीक्षेच्या शुल्काची रक्कम हि एससी, एसटी, माजी सैनिक, दिव्यांग, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (ईबीसी) प्रवर्गातील उमेदवारांना असणार नाही तर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०० रुपये शुल्क आहे. जर उमेदवार हा संगणक-आधारित चाचणी (सीबीटी) ला बसला असेल तर त्यांना शुल्क वजा करून त्यांना ४०० रुपये परत दिले जातील.

 

 

कशी असेल परीक्षा?

या परीक्षेचा कालावधी ९० मिनिटाचा असून, ज्यामध्ये उमेदवारांना १०० प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ३ गुण वजा केले जाईल. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी… Indian Railways Recruitment 2025

 

असा भरा अर्ज –

सर्वात आधी अधिकृत वेबसाइट indianrailways.gov.in ला भेट द्या.

आता वेबसाइटच्या होम पेजवरील RRB तंत्रज्ञ भरती लिंकवर क्लिक करा.

यानंतर तुमचे नाव आणि आवश्यक माहिती टाका.

ऑनलाइन शुल्क भरा.

आता आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.