ॲपल कंपनीचा iphone 17 लॉन्च, नेमकी काय आहेत वैशिष्ट्ये?

ॲपल कंपनीने सर्वांनाचं प्रतिक्षा असलेला आयफोन 17 अखेर लॉन्च केला आहे. जाणून घेऊयात याबबतची सविस्तर माहिती. ॲपल कंपनीने आज (9 सप्टेंबर) या वर्षातील सर्वात मोठे उत्पादन लॉन्च केले आहे. कंपनीने iPhone 17 लॉन्च केला आहे.ॲपल कंपनीने आज आपल्या नवीन iPhone 17 सह Apple Watch, AirPods Pro 3 आणि इतर अॅक्सेसरीजची घोषणा केली आहे.

या वर्षी Apple चार नवीन iPhone मॉडेल्स – iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max आणि iPhone 17 Air सादर iPhone 17 च्या लॉन्चच्या माध्यमातून ॲपल, सॅमसंग, गुगल आणि चीनमधील Huawei, Xiaomi यांसारख्या स्पर्धकांशी सामना देण्याचा प्रयत्न करत आहे. iPhone 17 च्या लॉन्चच्या माध्यमातून ॲपल, सॅमसंग, गुगल आणि चीनमधील Huawei, Xiaomi यांसारख्या स्पर्धकांशी सामना देण्याचा प्रयत्न करत आहे.

जगभरातील टेकप्रेमी उत्सुकतेने वाट पाहत असलेला ॲपलचा वार्षिक शो म्हणजे “Awe Dropping” इव्हेंट आज रात्री भारतीय वेळेनुसार 10.30 वाजता संपन्न झाला. आयफोन 17 मध्ये 24 मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा असेल जो कमी प्रकाशातही चांगला काम करेल, ज्यामुळे सेल्फी आणि फेसटाइम कॉल्स नेहमीपेक्षा जास्त स्पष्ट होतील.

iPhone 17 Pro आणि Pro Max मध्ये 2020 नंतर पहिल्यांदा डिझाइनमध्ये बदल केला आहे. फोनच्या मागील भागात नवीन कॅमेरा डिझाइन, A19 Pro प्रोसेसर, बॅटरी लाइफ वाढवणे, व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये सुधारणा आणि टेलीफोटो कॅमेरा 12 मेगापिक्सेलवरून 48 मेगापिक्सेलपर्यंत वाढवणे असे मुख्य बदल आहेत.

सेल्फी कॅमेरामध्येही मोठा अपग्रेड दिला गेला आहे. 2023 मध्ये टायटॅनियम फ्रेम वापरल्यानंतर या वर्षी पुन्हा अल्युमिनियम फ्रेमकडे परतले आहे, जे हलके आणि उष्णता नियंत्रणासाठी योग्य आहे.

iPhone 17 बेस मॉडेलमध्ये स्क्रीन थोडी मोठी करून 6.3 इंच करण्यात आली असून, ProMotion स्क्रीन आणि नवीन चिप वापरली आहे.