कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्जेसची वसुली : सरकार ॲक्शन मोडवर 

ताजी बातमी ऑनलाईन टीम

 

Cash on delivery आता दसरा दिवाळीचा काळ सुरू आहे. दसरा होऊन देखील काही दिवस उलटल आहेत. आता सणातील मोठा सण दिवाळी येणार आहे. यावर प्रत्येक जण विविध वस्तू खरेदी करत आहेत. यामध्ये आता नव्या फॅट नुसार ई कॉमर्स द्वारे ज्यादा वस्तू खरेदी केल्या जात आहेत. या खरेदी वेळी कॅश ऑन डिलिव्हरी करून खरेदी केल्यास आता या कंपन्या एक्स्ट्रा चार्जेस घेत आहेत.

 

याबरोबर आगाऊ पेमेंट देखील भरून घेऊन कंपन्या वस्तू आपणाला पाठवत असतात. मात्र काही कारणाने वस्तू परताव्याची वेळ आल्यास कंपन्या घेतलेली पैसे परत देण्यास विलंब करत आहेत किंवा वेगवेगळी कारणे काढून दिवस पुढे ढकलत आहेत. परिणामी ग्राहकता शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी हाच पर्याय निवडत आहेत.

 

याचा विचार करून ई-कॉमर्स कंपन्या कॅश ऑन डिलिव्हरी साठी काही एक्सट्रा चार्जेस घेत आहेत. अशा कारणांमध्ये ग्राहकांचे होणारी शोषण थांबवण्यासाठी सरकार आता ॲक्शन मोडवर उतरले आहे. याबाबत ग्राहकांनी देखील वेगवेगळ्या मार्गाने अनेक तक्रारी नोंदवले आहेत. तर या कंपन्या मात्र ग्राहकांवर आगाऊ पेमेंट करण्यासाठी दबाव देखील आणत असल्याचे सरकारच्या लक्षात आली आहे.

 

अमेझॉन सीओडी सारखे कंपन्या रुपये सात ते दहा एक्सट्रा चार्जेस घेत आहेत तर फ्लिपकार्ट आणि फर्स्ट क्राय या कंपन्या थेट दहा रुपये एक्स्ट्रा चार्जेस घेत आहेत. सर्वसामान्य नागरिकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी सरकार असे कुठे घडल्यास तक्रारी देखील करण्याचे आदेश सांगितले आहेत.