MPSC: 938 लिपिक टंकलेखक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, उद्योग निरीक्षक पदांची भरती

MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोग लिपिक टंकलेखक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, उद्योग निरीक्षक या गट क पदासाठी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोग

पदांची नावे व पदसंख्या
1. उद्योग निरीक्षक (उद्योग संचालनालय) पदसंख्या -9
2. तांत्रिक सहाय्यक (वित्त विभाग) पद संख्या -4
3.कर सहाय्यक (वित्त विभाग) पद संख्या -73
4. लिपिक टंकलेखक , पद संख्या -852
पात्रता – (१) तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक पदांकरिता उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य पात्र असलेली अर्हता धारण केलेली असावी.

(२) उद्योग निरीक्षक (गट-क) संवर्गाकरीता पदांकरिता उमेदवारांनी (अ) संवैधानिक विदयापीठाची अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा (ब) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी धारण केलेली असावी.

(३) पदविका/ पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्य प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/ माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदविका/ पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.

(४) अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज/माहिती स्वीकारण्याच्य विहित दिनांकापर्यत पूर्ण केली असली पाहिजे.

(५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

टंकलेखन पात्रता (१) कर सहाय्यक व लिपिक-टंकलेखक पदांकरिता मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

A I स्टॉकचे धुमशान : सहा महिन्यात पैसा डबल : वाचा फायद्याची गोष्ट 

Royal Enfield hunter 350 vs TVS Ronin : रॉयल एनफिल्ड हंटर की टीव्हीएस रोनिन कोणती बाईक जास्त पावरफुल? वाचा सर्व माहिती 

 

MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोग

वयोमर्यादा -एक फेब्रुवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय कर सहाय्यक पदाकरिता किमान 18 वर्षापर्यंत तर इतर सर्व पदांसाठी 19 वर्षांपर्यंत असणे आवश्यक.कमाल वय अमागास प्रवर्गातील उमेद्वारांकरिता ३८ वर्ष, तसेच मागासवर्गीय/ अनाथ/ आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेद्वारांकरिता ४३ वर्ष, तसेच दिव्यांग/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त प्रवर्गातील उमेद्वारांकरिता ४५ वर्ष, तसेच अंशकालीन कर्मचारी करीता ५५ वर्ष तर माजी सैनिक उमेदवारांना नियमानुसार सवलत देण्यात येईल.

परीक्षा- सदरची परीक्षा 4 जानेवारी 2026 रोजी घेण्यात येईल. याचे परीक्षक केंद्र जिल्हास्तरावर असेल.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. याबाबतची सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल.

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे click करा 
ऑनलाईन अर्ज  पाहण्यासाठी येथे click करा 
अधिकृत वेबसाईट  पाहण्यासाठी येथे click करा 

नोकऱ्यांची जलद माहिती मिळवण्यासाठी येथे click करा