लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे 1500 रुपये कधी मिळणार? वाचा 

लाडक्या बहिणींना सप्टेंबर चा हप्ता रुपये पंधराशेचा गेल्या पंधरवड्यात मिळाला आहे. आता ऑक्टोबर महिना सुरू होऊन पंधरा दिवस उलटले आहेत. त्यातच दिवाळी सारखा मोठा सण अगदी काही दिवसांवर आला आहे. यामुळे ऑक्टोबरचे रुपये 1500 कधी मिळणार याबाबत लाडक्या बहिणी आता विचारात पडले आहेत.

 

आज 15 तारीख झाली तरी देखील अद्याप ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत कोणत्याही प्रकारची घोषणा अद्याप सरकारकडून करण्यात आलेली नाही. यामुळे दिवाळी सण आणि हे पंधराशे यावरची चर्चा आता सर्वत्र दिसून येत आहे.

 

दरम्यान ऑक्टोबर चा हप्ता लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा दिवाळीतेही मिळू शकतो. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. लवकरच आदिती तटकरे या बाबतची घोषणा करतील.