Salary : पगार लवकर संपतो, तज्ज्ञांनी सुचवला 50-30-20 फॉर्म्युला, जाणून घ्या खर्चावर कसं नियंत्रण ठेवायचं?

जेव्हा नोकरी मिळाल्यानंतर पहिला पगार मिळतो तेव्हा अनेकांना आनंद होतो. जेव्हा महिना संपत येतो तेव्हा आर्थिक चणचण भासते. जवळपास प्रत्येकाची अशीच स्थिती असते. फायनान्शिअल प्लॅनिंग स्टँडर्डस बोर्डच्या सीईओ दांतेडी गोरी यांनी म्हटलं की पैशाचं व्यवस्थापन करणं म्हणजेच कमावणे, सुरुवातीलाच खर्च आणि बचत करणं, तीन गोष्टी एकाच वेळी सांभाळणं चांगलं असतं.

LPG price: भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती

Salary Slip Home Loan: सॅलरी स्लिप नाही, तरीही मिळवा पर्सनल लोन किंवा होम लोन : जाणून घ्या माहिती

दांते यांच्यामते सर्वात सोपा फॉर्म्युला 50-30-20 नियम आहे. या नियमाचा वापर करुन योग्य प्रकारे पगाराच्या रकमेचं व्यवस्थापन करता येऊ शकतं. तुमच्या पगाराच्या 50 टक्के रक्कम आवश्यक गोष्टींवर खर्च करण्यासाठी वापरावी. ज्यामध्ये घरभाडे, वीज आणि पाणी बील, अन्न धान्य आणि प्रवासाचा खर्च असेल. तर, 30 टक्के रक्कम खरेदी, चित्रपट पाहणे, पर्यटन किंवा हॉटेलिंगसाठी वापरावी. तर, 20 टक्के रक्कम भविष्यासाठी आर्थिक ध्येय निश्चित करुन बचत म्हणून ठेवावी. आपत्कालीन फंड, गुंतवणूक आणि निवृत्तिसाठीची रक्कम यासाठी 20 टक्के रकमेचा वापर करावा.

सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी सर्वात आकर्षक योजना

D Mart Offers : डी मार्ट मध्ये कोणत्या दिवशी मिळत सर्वात स्वस्त सामान? वाचा आत्ताच

Ladki Bahin: लाडक्या बहिणींचा पंधराशे चा हप्ता ‘या ‘ दिवशी जमा होणार?

नवे लोक चूक कुठं करतात?
दांते यांच्या मतानुसार काही लोक दररोजच्या छोट्या खर्चाला गांभीर्यानं घेत नाहीत. म्हणजेच सकाळी कॉफी घेणं, ऑनलाईन साहित्य मागवणं, कार बुकिंग यामुळं मोठा खर्च होतो. सर्व काही गोष्टी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. एकाच वेळी शंभर बदल करण्यापेक्षा एक दोन छोट्या बदलांपासून सुरुवात करा.

प्लानयोरवरल्ड डॉट कॉमचे संस्थापक आणि सीएफओ विप्लव मजूमदार यांच्या मते सुरुवातीला बजेट खूप टाईट केल्यास ते फार दिवस टिकणार नाही. सुरुवातीला मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक खर्च ट्रॅक करा. त्यानंतर तुम्ही जी बचत करायचं ठरवलं होतं तितकी रक्कम शिल्लक राहिली की नाही हे पाहा.

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ मोठ्या पदांसाठी निघाली भरती… कधीपर्यंत कराल अर्ज?

केंद्रीय व नवोदय विद्यालय १४९६७ शिक्षक/ शिक्षकेतर पदांची भरती

Railway Recruitment : रेल्वे भरती : 4116 अप्रेंटिस पदांची भरती: दहावी पासला संधी

अनेकदा आजारपण, नोकरीत समस्या किंवा मोठा खर्च करावा लागतो. अशावेळी आवश्यक गोष्टींना प्राधान्य द्या. अनावश्यक खर्च काही दिवस थांबवा आणि आपत्कालीन फंडात जमा असलेल्या रकमेचा वापर करा.

50-30-20 नियम तुम्ही वापरा, प्रत्येक खर्च लिहून ठेवा आणि भविष्यासाठी बचतीचा मार्ग वापरा. पगाराशिवाय इतर उत्पन्नाचे मार्ग देखील निर्माण करता येतात का पाहा.