Loan EMI : गृहकर्ज, कार लोनचा EMI होणार कमी? लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता

येत्या डिसेंबर महिन्यात पतधोरण समितीची बैठक होणार आहे. असे असताना आता भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी रेपो रेट कमी करण्याची संधी आहे असे म्हटले आहे. तसे झाल्यास सामान्यांना मोठा दिलासा मिळ शकतो.

लवकरच सामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर येऊ शकते. कारण जे लोक घर, गाडी किंवा पर्सनल लोन घेण्याचा विचार करत आहेत, त्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले

Home Loan: 20 वर्षांचे गृहकर्ज 11 वर्षांतच फेडा; 30 लाख झटक्यात वाचवा, तज्ज्ञांनी सांगितला एक नंबर उपाय

रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला; नेटकऱ्यांना सोशल मीडियात 2014 पूर्वी खिल्ली उडवणाऱ्या बिग बी, अक्षय कुमार, अनुपम खेर, जुई जावलाची आठवण!

मिळालेल्या माहितीनुसार भारतीय रिझर्व्ह बँक या वर्षाच्या शेवटपर्यंत रेप रेट कमी करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास गृहकर्ज, वाहन कर्ज, पर्सनल लोन स्वस्त होण्याची शक्यता आहे. व्याजदरात कपात केली जाऊ शकते.

रेपो रेट कमी झाल्यावर गृहकर्ज, वाहन कर्ज तसेच पर्सन लोन देताना व्याजदरात कपात केली जाईल. त्यामुळे सामान्यांना भराव्या लागणाऱ्या ईएमआयमध्येही कपात होईल. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी तसे संकेत दिले आहेत.

Home Loan: 20 वर्षांचे गृहकर्ज 11 वर्षांतच फेडा; 30 लाख झटक्यात वाचवा, तज्ज्ञांनी सांगितला एक नंबर उपाय

Home Loan: 20 वर्षांचे गृहकर्ज 11 वर्षांतच फेडा; 30 लाख झटक्यात वाचवा, तज्ज्ञांनी सांगितला एक नंबर उपाय

रेपो रेट कमी करायचा की तो स्थिर ठेवायचा याबाबतचा अंतिम नर्णय पतधोरण समितीकडून घेतला जाईल. परंतु रेपो रेट कमी करण्यासाठी संधी आहे, असे त्यांनी संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी पतधोरण समितीत नेमका काय निर्णय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पतधोरण समितीची पुढील बैठक येत्या 3 ते 5 डिसेंबर रोजी होणार आहे. ही बैठक अगदी तोंडावर आलेली असताना आरबीआयच्या गव्हर्नरांनी रेपो रेट कमी करण्याची संधी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता येत्या डिसेंबर महिन्यात खरंच रेपो रेट कमी होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.