Home Loan आता घर खरेदी इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. आता घरकरीसाठीचे मिळणारे गृह कर्ज अधिक स्वस्त झाले आहे. त्याचा व्याजदर आता चांगलाच कमी झाला आहे. भारत सरकारच्या आरबीआयने फोर्टींग रेट कर्ज नियमात मोठा बदल केला आहे.
या नव्या नियमात ग्राहकाचा फायदा होणार आहे क्रेडिट स्कोर सुधारल्यानंतर ग्राहकांना आता लगेच कमी व्याजदराचा फायदा मिळणार आहे त्यासाठी तीन वर्ष वाट पाहण्याची देखील गरज नाही. यासाठी बँकेकडे विचारणा करावी लागेल की काय आहे हा नियम?
UPI Payment: यूपीआय पेमेंट वर रिवॉर्ड्सचा पाऊस, हे छोटं काम करा आणि हमखास कॅशबॅक मिळवा
Pension : पेन्शन, कर, एलपीजी 1 डिसेंबर पासून नियम बदलणार; जाणून घ्या आपल्या खिशावर काय परिणाम होणार
बँका गृहकर्जावर दोन प्रकारे व्याजदर आकरतात. पहिला हा RBI रेपो रेट, T-Bill यील्ड सारखा असतो. तर दुसरा हा बेंचमार्क बँकेचा स्प्रेड असतो. स्प्रेड क्रेडिट रिस्क आणि कॉस्ट कव्हर करतो. नवीन नियमानुसार, स्प्रेडच्या नियमात काही बदल करण्यात आला आहे. म्हणजे जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर स्प्रेड कमी करून तुम्ही व्याजदर कमी करू शकता. यापूर्वी बँक 3 वर्षांत स्प्रेडचा आढावा घेत होत्या. नवीन मार्गदर्शक तत्वानुसार, आता हा लॉक इन पीरियड समाप्त करण्यात आला आहे. यामुळे क्रेडिट स्कोअर तर सुधारतोच. पण व्याजदर कपातीचा फायदा पण मिळतो.
आता राशन धान्य ऐवजी थेट दर महिन्याला कार्ड धारकांच्या खात्यात येणार एवढे पैसे!
असा कमी होईल स्प्रेड
या नियमाचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा क्रेडिट स्कोअर तपासावा लागेल. जर कर्ज घेतल्यानंतर तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारला असेल. तर लागलीच बँकेकडे जाऊन व्याज दरात कपात करण्याची मागणी करा. त्यासाठी अर्ज दाखल करा. त्यानंतर बँक क्रेडिटच्या आधारे तुमची मागणी योग्य आहे की नाही ते तपासेल आणि स्प्रेड कमी करेल. यामुळे व्याजदर कमी लागेल. अथवा बँक तुमचे बँकेचा कालावधी कमी करेल. दोन्ही बाबतीत तुमचा फायदा होईल.
Personal loan: फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड द्वारे पर्सनल लोन कसे घ्यावे ? काय करावे? वाचा सविस्तर
साधारणपणे गृहकर्ज हे दीर्घ कालावधीसाठी देण्यात येतात. ज्याचे गृहकर्ज 50-60 लाखांपर्यंत असेल त्यांना मोठा फायदा होईल. जर तुमचे व्याजदर 0.25 टक्के जरी कमी झाले तरी महिन्याकाठी अनेक हजार वाचतील. हा पैसा जर तुम्ही म्युच्युअल फंडात टाकला तर दुसरीकडून तुमची काही वर्षानंतर मोठी कमाई होईल.
ग्राहकांना करावी लागेल विचारणा
RBI च्या इंट्रेस्ट रेट ऑन ॲडव्हान्स अंतर्गत ग्राहकांना बँकेकडे जाऊन व्याजदर कपातीविषयी विनंती करावी लागेल. नवीन ग्राहकांना रेट कटचा फायदा लागलीच मिळू शकतो. तर जुन्या ग्राहकांना स्प्रेड रिव्ह्यूसाठी तीन वर्षांच्या कालावधीची प्रतिक्षा करावी लागत होती. पण नवीन नियमामुळे आता सर्वांना समान संधी आहे. क्रेडिट स्कोर सुधारल्याचे लक्षात येताच ग्राहकांना लागलीच व्याजदर कपातीचा लाभ मिळेल.