एअरपोर्टवर नोकरी हवीये? मग, या भरतीसाठी आत्ताच करा अप्लाय! पगार तर…

एअरपोर्टवर नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणांसाठी चांगली बातमी समोर आली आहे. एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया (AAI) कडून सीनिअर असिस्टंट आणि जुनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

 

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 12 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली असून उमेदवार www.aai.aero या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 11 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

 

सीनिअर असिस्टंट पदासाठी अप्लाय करण्यासाठी उमेदवारांकडे इलेट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/ रेडिओ इंजीनियरिंग क्षेत्रात 2 वर्षांचा डिप्लोमा आणि संबंधित क्षेत्रात 2 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसेच, जुनिअर असिस्टंट (HR) साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे ग्रॅज्युएशन (पदवी) असणं गरजेचं आहे. जुनिअर असिस्टंट (फायर सर्व्हिसेस) पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने 10 वी उत्तीर्ण असण्यासोबत 3 वर्षांचा मैकेनिकल/ ऑटोमोबाइल/ फायर क्षेत्रात रेग्युलर डिप्लोमा आणि रेग्युलर स्टडीमध्ये 12 वी पास असणं अनिवार्य आहे.

 

निवड प्रक्रिया

 

या भरतीसाठी लेखी परीक्षा आणि डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तसेच, जुनिअर असिस्टंट पदासाठी कंप्यूटर लिटरसी (संगणक साक्षरता) टेस्ट सुद्धा घेतली जाईल.

 

कसा कराल अर्ज?

 

1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे व्हॅलिड पर्सनल ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे.

2. या माध्यमातून यूजर आयडी, पासवर्ड आणि इतर महत्त्वाची माहिती पाठवली जाईल.

3. भरतीसाठी सर्वप्रथम www.aai.aero या अधिकृत वेबसाइटवर जा.

4. त्यानंतर, sign-up च्या टॅबवर पोस्ट अपायड, उमेदवाराचं नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अशी महत्त्वपूर्ण माहिती भरा.

5. आता Log Out च्या टॅबवर जाऊन आपल्या रजिस्टर्ड नंबरच्या माध्यमातून लॉगिन करा.

6. नंतर, अर्ज करण्यास सुरूवात करा. माहिती भरल्यानंतर दिलेल्या साइझमध्ये पासपोर्ट फोटो आणि सही अपलोड करा.

7. याव्यतिरिक्त, 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण मार्कशीट, जातीचा दाखला, ड्रायव्हिंग लायसन्स असे डॉक्यूमेंट्स स्कॅन करून अपलोड करा.

8. शेवटी, फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंटआउट काढा आणि सुरक्षितरित्या ठेवा.

अर्जाचं शुल्क

 

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य/ ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल. महिला/ एससी/ एसटी/ पीडब्ल्यूबीडी प्रवर्गातील उमेदवार तसेच, एक्स सर्व्हिसमॅन आणि AAI मध्ये एका वर्षाची अप्रेन्टिसशिपची ट्रेनिंग पूर्ण केलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही.