कोणतीही परीक्षा नाही थेट RBI मध्ये नोकरी; मिळणार भरघोस पगार; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

रिझर्व्ह बँकेने लेटरल रिक्रूटमेंटसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. या नोकरीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.

 

रिझर्व्ह बँकेत डेटा सायन्स, डेटा इंजिनियर, आयटी सिक्युरिटी एक्सपोर्ट, आयटी सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर, प्रोजेक्ट मॅनेजर, रिस्क अकाउंट, डेटा इंजिनियर, क्रेडिट रिस्क स्पेशलिस्ट या क्षेत्रात भरती जाहीर करण्यात आली आहे. या क्षेत्रात शिक्षण झालेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे.

 

रिझर्व्ह बँकेतील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १७ डिसेंबर २०२५ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करायचे आहेत.

 

रिझर्व्ह बँकेत एकूण ९३ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. लेटरल रिक्रुटमेंट म्हणजे एक्सपोर्ट किंवा अनुभवी प्रोफेशनलची नोकरीसाठी थेट नियुक्ती केली जाईल. ग्रेड सी पदांसाठी ही भरती असणार आहे.

 

पात्रता

 

रिझर्व्ह बँकेतील या नोकरीसाठी पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. डेटा सायंटिस्ट पदासाठी स्टॅटिस्टिक्स/इकोनॉमिक्स/मैथ/डाटा साइंस/फाइनेंस/इकोनॉमिक्स में मास्टर्स डिग्री किंवा बी.ई/बीटेक कॉम्प्युटर सायन्स पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत ४ वर्षांचा अनुभव असावा. डेटा इंजिनियर पदासाठी बी.ई /बीएससी/एमएससी/ एमटेक कंप्यूटर साइंस/इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी/इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक्स किंवा एमसीए पदवी प्राप्त केलेली असावी.

 

रिझर्व्ह बँकेतील या नोकरीसाठी किमान वयोमर्यादा २५ ते ४० वर्षे आणि कमाल वयोमर्यादा ४० ते ६० वर्षे असावी. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड प्रायमरी स्क्रिनिंग, शॉर्टलिस्टिंग, कागदपत्र पडताळणी आणि इंटरव्हयूनंतर फायनल सिलेक्शन केले जाईल. ही भरती फुल टाईम कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.