महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीची मोठी संधी! 290 पदांसाठी भरती, अर्जाला मुदतवाढ

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (Maharashtra Jeevan Pradhikaran – MJP) कडून मोठ्या प्रमाणात नोकरभरती जाहीर करण्यात आली असून, तब्बल 290 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

 

विशेष म्हणजे, अर्ज करण्याच्या अंतिम तारखेत वाढ करण्यात आल्याने अजून अर्ज न केलेल्या उमेदवारांना मोठी संधी मिळाली आहे.

 

अर्जाची अंतिम तारीख वाढली

 

MJP कडून जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी आता 26डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या मुदतीआधी mjp.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

कोणकोणत्या पदांसाठी भरती?

 

या भरती अंतर्गत गट-अ, गट-ब आणि गट-क मधील विविध पदांचा समावेश आहे. एकूण 290 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. पदनिहाय शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर अटींची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरात (PDF) मध्ये देण्यात आली आहे.

 

वयोमर्यादा आणि सवलत

 

अर्जदाराचे वय 1 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 45 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.

 

मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक (EWS), अनाथ तसेच दिव्यांग उमेदवारांना 5 वर्षांची वयोमर्यादा सवलत दिली जाणार आहे.

 

अर्ज शुल्क

 

खुला प्रवर्ग: ₹1000

 

मागासवर्गीय / EWS / अनाथ / दिव्यांग: ₹900

 

अर्ज शुल्काची भरपाई देखील ऑनलाईन पद्धतीनेच करावी लागणार आहे.

 

अर्ज कसा कराल?

 

mjp.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

 

भरतीशी संबंधित जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचा

 

“Apply Online” लिंकवर क्लिक करून नोंदणी करा

 

आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करा

 

भरतीसंदर्भातील सर्व नियम, अटी, पदांची यादी आणि पात्रतेची सविस्तर माहिती जाहिरातीत उपलब्ध असल्याने उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी ती नक्की वाचावी.