फक्त 10 वी उत्तीर्ण आहात? मग सरकारी नोकरीची ही संधी तुमच्यासाठी; DSSSB कडून मेगाभरती

नोकरीच्या शोधात (Government Jobs) असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची (Government Jobs) बातमी समोर आली आहे. दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ यांनी 714 एमटीएस (Sarkari Naukari) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

 

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 17 डिसेंबरपासून सुरू होत असून 15 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या भरतीची उमेदवारांना बराच काळ प्रतीक्षा होती आणि आ(Job Hiring) ता अखेर संधी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (Breaking News)

 

या भरतीसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. उमेदवारांकडे आधार कार्ड, दहावीचे प्रमाणपत्र आणि आवश्यक ओळखपत्रे असणे आवश्यक आहे. ही मूलभूत पात्रतेची नोकरी असल्याने कोणतीही अतिरिक्त पदवी किंवा विशेष अभ्यासक्रमाची अट ठेवण्यात आलेली नाही.

 

वयोमर्यादेबाबत सांगायचे झाल्यास उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 27 वर्षे असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, ईडब्ल्यूएस, पीडब्ल्यूबीडी तसेच माजी सैनिकांना शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. महिलांनाही नियमानुसार वयात सूट मिळणार आहे.

 

निवड प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे. लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल आणि सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील. या परीक्षेत नकारात्मक गुणांकन नाही. प्रश्नांचा दर्जा दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी होईल आणि त्यानंतर अंतिम निवड केली जाईल.

 

अर्ज शुल्काबाबत सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. महिला उमेदवार, एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी आणि माजी सैनिकांसाठी अर्ज शुल्क माफ करण्यात आले आहे. शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.

 

एमटीएस पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला अंदाजे 18000 ते 22000 रुपये इतका पगार मिळणार असून त्यात डीए, एचआरए आणि वाहतूक भत्त्यांचा समावेश असेल. अनुभव आणि विभागीय नियमांनुसार पगारात पुढील काळात वाढ होणार आहे.

 

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट dsssbonline.nic.in वर भेट देऊन एकवेळ नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर जाहिरात क्रमांक 07/2025 निवडून अर्ज भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, शुल्क भरून अंतिम तपासणीनंतर अर्ज सबमिट करावा.