लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी त्याआधी केवायसी करायची आहे. केवायसी करण्यासाठी अवघे ४ दिवस उरले आहेत. त्यामुळे अजूनही केवायसी केले नसेल तर लवकरच करावेत.
केवायसी करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता (Ladki Bahin Yojana KYC Deadline May Be Extended)
लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी डेडलाइन वाढण्याची शक्यता आहे.याआधीही एकदा मुदत वाढवण्यात आली होती. सध्या महापालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे ही मुदत वाढवली जाऊ शकते. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana November-December Installment)
लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिना संपायला आला आहे. तरीही अजून नोव्हेंबरचाही हप्ता देण्यात आलेला नाही. त्यानंतर आता जानेवारी महिनादेखील सुरु होईल. त्यामुळे तिन्ही महिन्याचे पैसे एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जाणार आहे. १४ जानेवारी म्हणजे मकरसंक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात.
महापालिका निवडणूकीपूर्वी डिसेंबर, जानेवारीचा हप्ता देण्याबाबत प्रयत्न सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहेत. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे.