प्रत्येकजण आपले म्हातारपण व्यवस्थित जावे, यासाठी वेगवेगळ्या (Pension) योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो. याचसोबत सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन मिळते. यासाठी तुम्हाला आतापासूनच गुंतवणूक करायची असते. या ५ योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळेल.
१. प्रधानमंत्री वय वंदन योजना
ही योजना ६० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांसाठी सुरु केली आहे.(Pension) या योजनेत गुंतवणूकदारांना एकरकमी रक्कम जमा करायची आहे. यानंतर मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर पेन्शन मिळते. या योजनेत तुम्ही १ लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत ७.४ टक्के व्याज मिळते.
२. एलआयसी जीवन शांती
एलआयसी जीवन शांती ही सिंगल प्रिमियम योजना आहे. तुम्ही या योजनेत कमीत कमी १.५ लाखांपासून गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला गुंतवणूकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळणार आहे.
३. SBI लाइफ सरल पेन्शन योजना
सबीआय सरल पेन्शन योजनेत ६५ वयोगटापर्यंत गुंतवणूक करायची असते. (Pension) या योजनेत सुरुवातीच्या पाच वर्षांसाठी गॅरंटीड बोनस दिला जातो. या योजनेत पहिल्या ३ वर्षासाठी २.५० टक्के तर २ वर्षांसाठी २.७५ बोनस मिळतो.
४. एसबीआय वीकेअर
स्टेट बँकेच्या वीकेअर योजना ही टर्म डिपॉझिट योजना आहे. या योजनेत ५ ते १० वर्षांसाठी मुदत ठेव करायची असते. या योजनेत ६.५० टक्के व्याजदर मिळते. या योजनेत दर तुम्ही मुदतीपूर्वी पैसे काढले तर कमी परतावा मिळतो.