Tata : टाटा कंपनीच्या ‘या’ शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या

टाटांच्या या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल. टाटा ग्रुपच्या टायटन या कंपनीनं दीर्घकालीन विचार करुन गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 20 वर्षापूर्वी कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल त्यांना चांगले रिटर्न मिळाले आहेत.

टायटन कंपनीच्या शेअरमध्ये 20 वर्षापूर्वी ज्यानं 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल त्याचं मूल्य 1 कोटींच्या पार गेलं आहे. टायटनच्या शेअरमध्ये 20 वर्षात 11000 टक्के तेजी आली होती.

टाटा ग्रुपच्या टायटन कंपनीचा शेअर 13 जानेवारी 2006 ला 35.70 रुपयांवर होता. 9 जानेवारी 2026 ला टायटनचा शेअर 4203 रुपयांवर बंद झाले. म्हणजेच गेल्या 20 वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 11677 टक्क्यांची तेजी आली आहे. ज्या व्यक्तीनं 13 जानेवारी 2006 ला टायटनचे 1 लाख रुपयांचे शेअर खरेदी केले असतील त्याचं सध्याचं मूल्य 1.17 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

टायटनच्या शेअरमध्ये गेल्या 10 वर्षात 1152 टक्क्यांची तेजी आली आहे. टायटनचा शेअर 15 जानेवारी 2016 ला 335.85 रुपयांवर होते. सध्या तो शेअर 4203 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या पाच वर्षात टायटनच्या शेअरमध्ये 171 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.

गेल्या वर्षात टायटनच्या शेअरमध्ये 21 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे. गेल्या सहा महिन्यात टायटनच्या शेअरमध्ये 22 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे. टायटनच्या शेअरमध्ये 52 आठवड्यांचा उच्चांक 4312 रुपये आहे. टायटन कंपनीनं त्यांच्या शेअरधारकांना बोनस शेअर दिलेले आहेत. कंपनीनं शेअरमध्ये स्प्लिट देखील केलेली आहे. जून 2011 मध्ये गुंतवणूकदारांनी 1 :1 असा बोनस शेअर दिला होता. कंपनीनं प्रत्येक शेअरवर बोनस शेअर दिलेला आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)