पिक विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: ज्यादा विमा रक्कम खात्यात येणार

मित्रांनो,शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांच्या नुकसान होते. या झालेल्या नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आले आहे. पीक विमा मध्ये सरकारने काही बदल केलेले आहेत ते बदल आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. Insurance for Farmer

शेतकऱ्यांना ज्यादा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेच्या निकषात केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत, त्यामुळे खरीप २०२३ मधील पावणेदोन कोटी शेतकऱ्यांच्या विमा प्रस्तावांची छाननी नव्या निकषानुसार करण्याचे आदेश राज्यातील 9 विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत.गेल्या हंगामात 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. Pantapradhan pik vima yojana maharashtra

‘हे’ ॲप देत आहे 5 लाखांचे अर्जंट कर्ज : Personal loan

त्यामुळे योजनेत सहभागी झालेल्या 9 विमा कंपन्यांना 8 हजार कोटी रुपयांचा विमा हप्ता मिळणार आहे, या कंपन्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची 54 हजार कोटी रुपयांचे विमा संरक्षण दिलेले आहे. खरीप २०२३ मधील पीकविमा धारक शेतकऱ्यांना अद्याप विमा भरपाई मिळालेली नाही. म्हणून केंद्र शासनाने विमा योजनेचे निकष बदलताच आता विमा कंपन्या सक्रीय झाल्या आहेत.pik vima yojana

नवे सूत्र किचकट असले तरी शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. या सूत्रानुसारच शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश केंद्राने दिलेले आहेत. त्यानुसार लवकरच शेतकऱ्यांचे विमा दावे अंतिम होतील आणि केंद्राच्या मंजुरीनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाईच्या रक्कमा जमा होतील. नवा निकषानुसार प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रस्तावावर घेतल्या गेलेल्या निर्णयाची माहिती विमा कंपन्यांना केंद्राकडे पाठवावी लागेल.Insurance for Farmer

‘या’ विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 60 हजार रुपये : सविस्तर वाचा ‘ही’ योजना : Scholarship

त्यामुळे शेतकऱ्यांना https://pmfby.gov.in/ या संकेतस्थळावर घरबसल्या विमा प्रस्तावाची माहिती मिळेल. मंजूर झालेली भरपाई आता आधार संलग्न बँक खात्यात वर्ग केली जात आहे. मागील तपशील देखील आता शेतकऱ्यांना दिसणार असल्यामुळे खोटी माहिती देत दुसऱ्याच्या बँक खात्यात आपली रक्कम वळवली गेली का, याची माहिती तात्काळ शेतकऱ्यांना मिळणार आहे. Insurance for Farmer

केंद्राने विमा कंपन्यांना आणखी एक अट घातली आहे, पूर्वी शेतकरी व सरकारकडून विमाहप्ता घेतल्यानंतर विमा कंपन्या स्वतः हिशोब करून नुकसान भरपाईच्या रक्कमा परस्पर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करीत होत्या. परंतु आता नव्या निकषानुसार विमा कंपन्यांना भरपाईचा हिशोब केल्यानंतर भरपाई रक्कम केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या पीएफएमएस कडे (सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली) कडे वर्ग करायची आहे.Insurance for Farmer

महाराष्ट्र घरगुती कामगार कल्याण मंडळ: सन्मान धन योजना: दरवर्षी कामगारांना मिळणार 10 हजार रुपये

त्यानंतर केंद्राच्या नियंत्रणात ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होणार आहे.पीकविमा योजनेतील जुन्या निकषांमध्ये पीक कापणी प्रयोगाचे निष्कर्ष काही घटकांमध्ये शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत नव्हते. नव्या निकषात पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे हित लक्षात घेण्यात आले आहे. पीक कापणी प्रयोगानंतर उत्पादनात 50 टक्के घट असल्यास (उदा. सोयाबीनची हेक्टरी विमा संरक्षित रक्कम 50 हजार रुपये असल्यास) 50 टक्के म्हणजेच 25 हजार रुपये भरपाई शेतकऱ्याला मिळेल.pik vima yojana

मिळवा 10 लाख रुपये पर्यंत कर्ज : महिला उद्योग निधी योजना : Loan

मध्य हंगाम प्रतिकुल परिस्थितीमध्ये अग्रिम नुकसान भरपाई 7500 रुपये दिलेली असल्यास मिळणारी नुकसान भरपाई 17500 रुपये (पीककापणी नुकसानमधुन दिलेला अग्रिम समायोजित करून येणारी रक्कम) राहील. म्हणजेच 25 हजार रुपये वजा 7500 रुपये करता, 17500 रुपये दिले जातील, मात्र पीक कापणी प्रयोगात नुकसान शून्य आले, तरी शेतकऱ्यांना दिलेला आधीचा अग्रिम विमा रक्कम वसुल केला जाणार नाही.

एअरटेल देत आहे 5000 ते 9 लाखांपर्यंतचे Personal Loan

स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 15 हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली गेली असल्यास आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान 50 टक्के आल्यास मिळणारी नुकसान भरपाई 17500 रुपये राहील. कारण 15 हजार रुपये आधीच दिलेले असल्यामुळे विमा संरक्षित रक्कम 35 हजार रुपये गृहीत धरली जाईल व तिच्या 50 टक्के रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे.pik vima yojana

अशाप्रकारे पिक विमा योजनेत काही बदल हे अशा प्रकारे घडून आलेला आहे.

जनऔषध केंद्र कसे सुरु करावे : वाचा सविस्तर रोजगार संधी