मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी! चौथी पास उमेदवारांकडून अर्ज मागवले; 52 हजारांपर्यंत पगार

Bombay High Court Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेत माळी/मदतनीस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी केवळ चौथी उत्तीर्ण उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी देण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

भरतीचा तपशील

  • संस्था: मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court)
  • पदाचे नाव: माळी / मदतनीस
  • एकूण रिक्त पदे: 2
  • निवड यादी: 3
  • प्रतीक्षा यादी: 1
  • अर्ज पद्धत: ऑफलाइन
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 20 ऑगस्ट 2026

वेतन

निवड झालेल्या उमेदवारांना S-3 वेतनश्रेणीनुसार ₹16,600 ते ₹52,400 इतका पगार मिळणार आहे. याशिवाय महागाई भत्ता व शासन नियमांनुसार इतर भत्तेही देण्यात येतील.

आवश्यक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असावा आणि त्याला मराठी भाषा वाचता, लिहिता व बोलता येणे आवश्यक आहे.

याशिवाय बगीचे, हिरवळी, झाडे व वनस्पतींची देखभाल करण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे.

१२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उत्तम संधी – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 289 पदांकरिता मोठी भरती; ऑनलाईन अर्ज करा!

वयोमर्यादा

  • खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय: 18 ते 43 वर्षे
  • शासकीय/न्यायालयीन कर्मचारी: किमान 18 वर्षे (कमाल वयोमर्यादा लागू नाही)

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

उमेदवारांनी अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे स्वयंघोषणापत्र, जातीचा दाखला (लागू असल्यास), अधिवास प्रमाणपत्र, सेवायोजन नोंदणी प्रमाणपत्र (असल्यास), ना-हरकत प्रमाणपत्र (शासकीय कर्मचाऱ्यांसाठी), नाव बदलासंदर्भातील कागदपत्रे (विवाहित महिलांसाठी) तसेच ‘BOMBAY HIGH COURT ORIGINAL SIDE’ यांच्या नावे ₹1,000 चा डिमांड ड्राफ्ट जोडणे आवश्यक आहे.

मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; 473 पदांसाठी भरती होणार, महत्त्वाची अपडेट समोर

अर्ज कुठे पाठवायचा?

इच्छुक उमेदवारांनी अर्ज स्पीड पोस्टद्वारे खालील पत्त्यावर 20 ऑगस्ट 2026 रोजी किंवा त्यापूर्वी पोहोचेल याची काळजी घ्यावी.

मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय मुंबई
वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला,
P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई – 400032

भरती प्रक्रियेची जाहिरात पाहण्यासाठी Bombay HC Recruitment 2026 notification pdf या लिंकवर क्लिक करा.

उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता, कागदपत्रे आणि अटी-शर्तींची खात्री करूनच अर्ज सादर करावा. अपूर्ण अथवा चुकीची माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या चौथी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही भरती उत्तम संधी मानली जात आहे.