बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाची निवडणुकीच्या (Gokul Election Result 2026) मतमोजणी सध्या सुरु आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला सतेज पाटील गटाचे अभिजीत तायशेटे आणि शशिकांत पाटील चुयेकर यांनी महायुतीला घाम फोडल्याचे दिसून येत आहे. गोकुळमध्ये जोरदार उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे 14 उमेदवार आघाडीवर आहेत. तर महायुतीचे 11 उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे महायुतीच्या पॅनलला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. आताची आघाडी कायम राहिल्यास सतेज पाटील एकहाती सत्ता स्थापन करू शकतात.
18 ऑक्टोबर रोजी गोकुळसाठी अत्यंत 99.96 टक्के मतदान चुरशीने पार पडले. विक्रमी मतदान पार पडल्यानंतर आता गोकुळची सत्ता महायुतीप्रणीत ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या ताब्यात जाणार की आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या ताब्यात जाणार यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संचालकपदाच्या 25 जागांसाठी एकूण 50 उमेदवार रिंगणात उतरले होते. (Kolhapur Gokul Election 2026)
सतेज पाटलांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे विजयी उमेदवार
शशिकांत पाटील चुयेकर
बाबासाहेब श्रीपती चौगुले
अभिजित प्रभाकर ताईशेटे
किसन बापू सो चौगुले
राहुल बजरंग देसाई
बाबासाहेब विष्णू देवकर
विश्वजित दिनकरराव जाधव
विद्याधर बाबूराव गुरबे
सचिन दौलतराव घोरपडे
अंजना केदारी रेडेकर
भाग्यश्री धीरज डोंगळे
शशिकांत शामराव खोत
राजुबाबा जयवंतराव आवळे
बयाजी देवू शेळके
महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी
राजेश नरसिंगराव पाटील
राहुल पी. एन. पाटील
रणजित के. पी. पाटील
रणजित दिलीप पाटील
अंबरिशसिंह संजय घाटगे
चेतन अरुण नरके
अजित शशिकांत नरके
अजित पांडुरंग पाटील
वीरेंद्र संजय मंडलिक