मित्रांनो, जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदासाठी नवीन जाहिरात करण्यात आली आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना अंतर्गत ही भरती होणार आहे. यामध्ये विविध पदाचा समावेश असून बारावी पास, पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवार सुद्धा येथे अर्ज भरता येणार आहेत. हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. एकूण 269 रिक्त पदावर ही भरती होणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणावर 2024 मध्ये पहिल्यांदाच भरती होत आहे. Zp pune
या भरती मध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) याचा समावेश आहे. बारावी पास, पदवीधर, आणि पदव्युत्तर उमेदवार येथे अर्ज करू शकणार आहेत.पदा नुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एमबीबीएस कडली नोंदणी अनिवार्य असेल. नोंदणी अर्हताधारकास प्राधान्य देण्यात येईल. जर एमबीबीएस अर्हताधारक उमेदवार उपलब्ध झाला नाही तर बीएएमएस अर्हताधारक उमेदवार घेण्यात येईल.
बी ए एम एस अर्हताधारकांकरिता एमसीआयएम नोंदणी धारक असणे आवश्यक असणार आहे. स्टाफ नर्स पदासाठी जी एन एम तसेच बीएससी नर्सिंग आणि एम एस सी कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य असेल. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यासाठी कमीत कमी बारावी पास तसेच पॅरामेडिकलचा बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला असणं गरजेचं आहे किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स कोणत्याही शासनमान्य संस्थेतून झालेला असल्यास त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदासाठी दर महिना 18000 रुपये प्रति महिना मानधन देण्यात येणार असून स्टाफ नर्स साठी 20000 रुपये प्रतिमहिना मानधन देण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 60000 रुपये प्रति महिना मानधन निवड झालेल्या उमेदवारास देणार आहे, वेगवेगळ्या संवर्गानुसार ही भरती असून वैद्यकीय अधिकारीचे एकूण 94 पदे, स्टाफ नर्सची एकूण 78 पदे व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांचे एकूण 97 पदे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान अंतर्गत भरली जाणार आहेत.
पंधराव्या वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्यवर्धनी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी म्हणून एमबीबीएस पदवीधारकाच्या नियुक्तीला येथे प्राधान्य देण्यात येणार आहे. परंतु अनेक प्रयत्न करूनही एमबीबीएस पदवीधर उमेदवार उपलब्ध न झाल्यास पंधरावे वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता वैद्यकीय अधिकारी म्हणून एमबीबीएस पदवीधर उपलब्ध होईपर्यंत अथवा 6 ते 11 महिन्याकरिता बी एम एस पदवीधारक उमेदवार यांना वैद्यकीय अधिकारी म्हणून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात येणार आहे.
उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्जाची पडताळणी करून मुलाखतीसाठी उमेदवाराला बोलावण्यात येणार आहे. स्टाफ नर्स व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागून गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 11 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत.
अर्जासोबत जन्मतारखे करिता वयाचा दाखला, दहावीची टीसी, जन्म प्रमाणपत्र, फोटो आयडी, रहिवासी दाखला, लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक असेल.उमेदवाराने अर्ज करते वेळेस आपला मोबाईल नंबर व ईमेल आयडी व्यवस्थित रित्या जोडणे सुद्धा आवश्यक आहे. अर्ज सोबत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 300 रुपये आणि मागास प्रवर्गाचे उमेदवारांसाठी 200 रुपये एवढे शुल्क ऑनलाईन पद्धतीने गुगल पे किंवा फोन पे वरून तुम्ही भरू शकता.
तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर https://cha.maha-arogya.com/ या वेबसाईटवरून तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज भरू शकता.