मित्रांनो, भारत सरकारने तसेच महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना जाहीर केल्या आहेत की जा मार्फत सर्व सामान्य माणसांना त्याचा लाभ घ्यावा. याबाबत त्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारणा केली जाते.
याच योजनांमध्ये काही योजना या मुलींसाठी व महिलांसाठी सुरू करण्यात आलेला आहे. की जेणेकरून महिला व मुले आपल्या शिक्षणासाठी, आपल्या घरातील कुटुंबासाठी व आपल्या आपल्याला येत असलेल्या कौशल्यांवर भर देऊन कोणता तरी व्यवसाय उभा करावा.
यांसाठी सरकार आर्थिक मदत करत असते व त्यांना पुढे जाण्यासाठी बळ मिळत असतो. या योजनांबद्दल आजच्या या लेखांमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत की, सरकारने मुलींसाठी व महिलांसाठी कोणकोणत्या योजना चालू केलेल्या आहेत?
यातील एक दोन योजना अशा आहेत ज्यामुळे महिला लखपती होऊ शकतात, तर काही योजना अशा आहेत ज्याच्या लाभामुळे महिला करोडपती होऊ शकतात. या मध्ये महिलांच्या शिक्षणासाठी अनुदान, व्यवसायासाठी कर्ज, त्यांना मोफत प्रशिक्षण, मोफत गॅस अशा काही महत्वाच्या सुविधांचा त्यांना लाभ मिळणार आहे.
पहिली योजना म्हणजे ‘मोफत शिलाई मशीन योजना’
देशतील मोठ्या लोकसंख्ये मध्ये गरीब आणि मिडल क्लास महिलांचा समावेश आहे. या महिलांना रोजच्या गरजा भागविण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आणि महिलांची हीच समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने गरीब आणि कष्टकरी महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याची योजना सुरु केलेली आहे.
मोफत शिलाई मशीन या योजनेंतर्गत केंद्र सरकार देशातील प्रत्येक राज्यात 50 हजाराहून अधिक शिलाई मशीन देत आहे. ज्यामधून तुम्हाला स्वतःचा रोजगार सुरु करता येईल आणि यामधून तुम्हाला तुमच्या रोजच्या गरजा भागविता येतील इतके पैसे मिळतील. तसेच या साठी तुम्हाला एका विशेष योजेतून ट्रेनिंग सुद्धा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
दुसरी योजना म्हणजे ‘मोफत पिठाची गिरणी योजना’ (फ्री फ्लोअर मिल योजना) महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबविण्यात येत आहे. 100% अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी दिली जात आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
मोफत पिठाची गिरणी ही योजना खास करून महिलांसाठी राबविण्यात येणारी एक महत्वाची योजना आहे. मोफत पिठाची गिरणी, दाळ गिरणी, मसाला गिरणी देण्याची योजना सध्या महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात शासनाकडून राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळत आहे. महिला वर्ग स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती बळकट करण्यासाठी शासनामार्फत ही योजना राबविली जात आहे.
म्हणून या योजनेचा लाभ केवळ महिलांनाच घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार किंवा त्यापेक्षा कमी असावे. ज्या महिलांचे 1 लाख 20 हजार पेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील महिला आणि शहरी भागात राहणाऱ्या महिलांना घेता येऊ शकतो.
पुढील योजना म्हणजे “लेक लाडकी योजना” शासनाकडून नेहमीच मुलींना व महिलांना सक्षम व आत्मनिर्भर बनवण्यासाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. विविध प्रकारच्या अशा योजना आहेत ज्या मधुन महिलांना व मुलींना आर्थिक लाभ दिला जातो. त्या योजनांपैकीच एक नव्या स्वरुपात शासनाकडून नवीन योजना खास मुलींसाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र मुलींना 1 लाख 1 हजाररुपये मिळतात.
लेक लाडकी योजनेचा लाभ कशा प्रकारे दिला जातो? ते आपण पाहूया. कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5000 रुपये मिळतात.ती मुलगी पहिलीत गेल्यावर – 6000 रुपये.मुलगी सहावीत गेल्यावर – 7000 रुपये.
मुलगी अकरावीत गेल्यावर – 8000 रुपये.लेकींच्या उज्जवल भविष्यासाठी मुलीच्या वयाचे 18 वर्षे पूर्ण झाल्यावर-75000 रुपये थेट बँक खात्यात मिळतात. असे एकुण 1 लाख 1 हजार रुपये मिळतात.
मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ही योजना शासनाकडून राबविण्यात येत आहे.
पुढील योजना म्हणजे ‘उद्योगिनी योजना’ स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हावे आणि संसारात आर्थिक हातभार लावावा. यासाठी महिलांची सातत्याने धडपड असते. आणि व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक उपन्न वाढवावे म्हटले तर स्वतः जवळ भांडवल नसते. त्यामुळे महिला उद्योग व्यवसाय उभारू शकत नाहीत. त्याच्या जवळ कौशल्य असूनही आर्थिक अडचणी अभावी त्यांना व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे राज्यात शासनाकडून महिलांसाठी उद्योगिनी योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत महिलांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येते. तसेच या योजनेंतर्गत 1 लाखाच्या कर्जावर 30 टक्के अनुदान सुद्धा देण्यात येते. उद्योगिनी योजनेंतर्गत 18 ते 55 वयोगटातील महिलांना व्यवसाय, कृषी, लघुउद्योगासाठी बँकेच्या वतीने कर्ज पुरवठा केला जातो.
पुढील योजना म्हणजे ‘महिला सन्मान बचतपत्र योजना’
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महिला सन्मान बचतपत्र या योजनेची घोषणा केली आणि 1 एप्रिल 2023 पासून ही योजना सुरु झाली आहे. ही एक बचत योजना आहे. ही योजना खासकरून महिलांसाठी सुरु करण्यात आली आहे. महिला स्वतःसाठी आणि त्यांच्या अल्पवयीन मुलींसाठी या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. याशिवाय पती आपल्या पत्नीसाठी सुद्धा या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
या योजनेत किमान 1000 रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. आणि जास्तीत जास्त 2 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. त्यावर वार्षिक 7.5 टक्के व्याज दिले जाते. गुंतवणुकीवरील व्याज दर तीन महिन्यांनी खात्यात जमा केले जाते. या योजनेचा कालावधी 2 वर्षाचा आहे. या योजनेची मॅच्युरीटी पिरीयड दोन वर्षाचा असला तरी एका वर्षानंतर योजनेतून ठराविक रक्कम म्हणजेच 40% रक्कम काढता येते. कोणत्याही बँकेतून किंवा पोस्टातून या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकतात.
अशाप्रकारे या काही योजना आहेत की ज्या महिला व मुलींसाठी भारत सरकार व राज्य सरकार यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेला आहे.