मित्रांनो, जर तुमची दहावी झाली असेल आणि तुम्ही दहावी पास असाल व तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे आहे असे वाटत असेल तर आज आपण अशा काही सरकारी नोकऱ्यांबद्दल माहिती पाहणार आहोत की ज्यांच्या जागा निघालेल्या आहेत. त्याचा अर्ज कसा करावा? अर्जासाठी किती फी आकारले जाते?
त्याचबरोबर कोण कोण या अर्ज करू शकता? अर्जाची पात्रता कोणती आहे? लागणारे कागदपत्रे कोणती व अर्ज किती तारखेपर्यंत करावा? त्याचबरोबर या सरकारी नोकरीमध्ये मिळणारे वेतन किती? याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
प्रत्येकाला असे वाटत असते की आपल्याला सरकारी नोकरी असावी आणि आजकाल सरकारी नोकरी हीच सुरक्षित नोकरी मानली जाते. कारण आजकालच्या या घडामोडीच्या जीवनामध्ये सरकारी नोकरी शिवाय पर्याय उरला नाही आहे. म्हणूनच सरकारी नोकरी ही सुरक्षित नोकरी मानले जाते. आज अनेक प्रकारचे सरकारी नोकरी मधील जागा निघालेल्या आहेत. त्यातीलच काही जागांविषयी आजच्या लेखामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत.
संरक्षण मंत्रालयाने (MOD) फायरमन पदांसाठी भरती साठीचा जागा निघालेल्या आहेत. या भरतीद्वारे एकूण 40 पदे भरण्यात येणार आहेत. जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात. या अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे. या पदासाठी आवश्यक पात्रता या तुम्ही 56 वर्षाच्या आतील असावेत 18 वर्षाच्या वरील असावेत.
त्याचबरोबर तुम्ही दहावी उत्तीर्ण असावे. या पदांतर्गत जर तुम्ही फॉर्म भरला तर या अंतर्गत तुम्हाला 19900 ते 63200 इतके दर महिना वेतन मिळते. त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र म्हणजे दहावी उत्तीर्णचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे आधार कार्ड,पॅन कार्ड,जात प्रमाणपत्र, मूळ पत्ता पुरावा, नवीन रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो,स्वाक्षरी, सक्रिय मोबाइल नंबर,सक्रिय ईमेल आयडी,इतर इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.
याची संपूर्ण माहिती तुम्हाला ऑनलाइन मिळू शकते. त्याप्रमाणे तुम्ही त्याची माहिती जाणून घेऊन याचा अर्ज नक्की करावा.
जर तुम्हाला देखील सहकार्य नोकरीची आवश्यकता असेल तर तुम्ही नक्कीच या पदासाठी अर्ज भरू शकता. यासाठी शिक्षणाची पात्रता देखील फक्त दहावी पास इतकीच आहे.
अधिक माहितीसाठी https://drive.google.com/file/d/1SYn9sTIJfxQnlbVF2vafj8VgfNiJgf8Z/view ही वेबसाईट पहावी .