पोस्ट ऑफिस योजना  ₹ 10 लाख ठेवीवरील व्याजातून ₹ 4.10 लाख कमाईची हमी प्रत्येक तपशील जाणून घ्या 

मित्रांनो. पोस्ट सेवा ही अनेक भारतीयांना खूपच जवळची सेवा आहे. कारण यामध्ये केलेली कोणतीही गुंतवणूक ही अत्यंत सुरक्षित असते व पोस्टामार्फत विविध योजनांचा देखील लाभ हा होत असतो. म्हणूनच आज आपण पोस्टाने काढलेला एका योजनेबद्दल ची माहिती आपण जाणून घेणार आहोत. की ज्यामध्ये दहा लाख ठेवीवर या चार लाख दहा हजार रुपये इतकी कमाई आपली होऊ शकते. याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. की ज्यामध्ये ही योजना नेमकी कोणती आहे? कशाप्रकारे आपल्याला इतका व्याजदराचा फायदा मिळते?

पोस्ट ऑफिस SCSS ही योजना वार्षिक ८.२ टक्के व्याज देते. या योजनेचा कालावधी ५ वर्षांचा आहे. 1000 रुपयांच्या पट्टीमध्ये आपल्याला या योजनेमार्फत ठेव ठेवावी लागते. पोस्ट ऑफिसची ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा आहे. की ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आपली गुंतवणूक करू शकतात. या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस स्मॉल सेविंग स्कीम अशी आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक करण्यासाठी योग्य असा पर्याय आहे.

यामध्ये हमी परताव्यासह ठेव पूर्णपणे सुरक्षित राहते. यातील गुंतवणुकीवर बाजारातील चढउतारांचा परिणाम होत नाही. पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, ही योजना वार्षिक ८.२ टक्के व्याज देते. या योजनेतील मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे. 1000 रुपयांच्या पटीत ठेव करता येते. यामध्ये जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. यामध्ये एकरकमी गुंतवणूक करावी लागेल.

तुम्ही ज्येष्ठ नागरिक योजनेत 5 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केल्यास, 8.2 टक्के वार्षिक व्याज दराने (चक्रवाढ), 5 वर्षानंतर म्हणजेच मॅच्युरिटीवर एकूण रक्कम 14,10,000 रुपये होईल. येथे तुम्हाला व्याजातून 4,10,000 रुपयांचे हमी उत्पन्न मिळेल. अशा प्रकारे, प्रत्येक तिमाहीचे व्याज रु. 20,500 असेल. पोस्ट ऑफिसच्या SCSS अंतर्गत, 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती खाते उघडू शकते.

जर एखाद्याचे वय 55 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल परंतु 60 वर्षांपेक्षा कमी असेल आणि त्याने VRS घेतले असेल तर तो SCSS मध्ये खाते देखील उघडू शकतो. परंतु अट अशी आहे की त्याला सेवानिवृत्तीचे लाभ मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत हे खाते उघडावे लागेल आणि त्यात जमा केलेली रक्कम ही सेवानिवृत्तीच्या लाभाच्या रकमेपेक्षा जास्त नसावी. या योजनेत, ठेवीदार त्याच्या पत्नी/पतीसोबत वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे एकापेक्षा जास्त खाती ठेवू शकतो.

परंतु एकत्रितपणे घेतलेली कमाल गुंतवणुकीची मर्यादा 30 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही.३ वर्षांपर्यंत वाढवता येईल. खातेधारक ज्येष्ठ नागरिक बचत योजनांमध्ये आपले खाते मुदतपूर्व बंद करू शकतात. परंतु खाते उघडल्यानंतर 1 वर्षानंतर खाते बंद केले तरच पोस्ट ऑफिस ठेवीतून 1.5 टक्के कपात करेल. तर 2 वर्षानंतर बंद केल्यास ठेवीतील 1 टक्के रक्कम कापली जाईल. मॅच्युरिटीनंतर खाते आणखी तीन वर्षांसाठी वाढवता येते. यासाठी मुदतपूर्ती तारखेपासून एक वर्षाच्या आत अर्ज द्यावा लागेल.

खाते उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळी नामांकन सुविधा उपलब्ध आहे. हे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करता येते. यामध्ये 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. तर व्याज उत्पन्नावर कर आकारला जातो.

अशाप्रकारे ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या वयाच्या मानाने अत्यंत उपयुक्त अशी आहे. यातून ज्येष्ठ नागरिकांना अधिक फायदे होतात व त्यांना जास्त व्याजदरामध्ये त्यांनी केलेला गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा देखील मिळतो. तुम्ही देखील या योजनेत सहभागी होणार असाल तर तुम्ही तुमच्या शहरातील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन याची सविस्तर माहिती घेऊन त्यासाठी अर्ज करू शकता.

अशाप्रकारे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक गुंतवणूक आहे. तुम्ही देखील उपयोग करून घेणार असाल तर नक्कीच पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या योजनेबद्दलचे संपूर्ण माहिती जाणून घेऊन यासाठी लागणारे खाते उघडून त्यावर गुंतवणूक करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.