SBI E-Mudra Loan Apply Online आता 5 मिनिटांत मिळवा 50 हजार रुपयांचे कर्ज! असा करा अर्ज!…

मित्रांनो, आपल्याला प्रत्येकाला कर्जाच्या आवश्यकताही असते. म्हणून आपण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कारणासाठी कर्ज काढत असतो. आजच्या लेखांमध्ये आपण एसबीआय मार्फत अनेक प्रकारचा लोन दिले जातात. त्यातीलच एसबीआय इ मुद्रा लोन विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. की यामध्ये ऑनलाइन अर्ज करून आपण कशाप्रकारे पाच मिनिटांमध्ये त्यांना हजार पर्यंत कर्ज मिळू शकतो. तसेच या कर्जाचा अर्ज भरण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता लागू शकते? या सर्वांबद्दलची सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.

 

आजच्या व्यवसाय आणि उद्योजकतेच्या काळात, रोजच्या आर्थिक समस्या संपवण्यासाठी एक चांगला आणि योग्य पर्याय शोधणे महत्त्वाचे झाले आहे. जर तुम्हाला उद्योग व्यवसाय करायचा असेल तर आनंदी जीवनाकडे आणि यशाकडे वाटचाल करताना, तुमचे व्यवसाय करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी SBI E Mudra Loan हा एक उत्तम पर्याय आहे. SBI E Mudra Loan अंतर्गत कर्ज मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता, परंतु ऑनलाइन अर्ज केला तर तुम्हाला फक्त ₹50000 पर्यंत कर्ज दिले जाईल, आणि यापेक्षा जास्त कर्ज घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन प्रक्रियेतून जावे लागेल.

 

 

SBI E-Mudra Loan म्हणजे काय? हे आपण जाणून घेऊया 2018 मध्ये भारत सरकारने पंतप्रधान मुद्रा कर्ज ही योजना सुरू केली होती. याअंतर्गत जे कोणी लहान व्यावसायिक किंवा मोठे व्यापारी असतील जे पैशाच्या कमतरतेमुळे आपला व्यवसाय वाढवू शकत नाही किंवा व्यवसाय करण्यास असमर्थ आहे, त्यांना बँकांकडून कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना SBI E-Mudra Loan देते. SBI E-Mudra Loan हा व्यवसाय आणि उद्योजकतेसाठी आवश्यक आर्थिक सहाय्य प्रदान करणारा एक सोपा मार्ग आहे, आणि तो SBI द्वारे नियंत्रित केला जातो.

 

SBI e-Mudra Loan कर्जाद्वारे, स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना ₹ 50 हजार ते ₹1 लाखांपर्यंतचे कर्ज देते. SBI ई मुद्रा लोन अंतर्गत तुम्हाला 5 मिनिटांच्या आत 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही त्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला कागदपत्र जमा करण्यासाठी कोणताही त्रास होणार नाही आणि फक्त पाचच मिनिटांत तुमच्या खात्यात 50,000 रुपयांचे कर्ज येईल.

 

परंतु जर तुम्हाला ₹ 50 हजार ते ₹1 लाखांपर्यंतचे चे कर्ज घ्यायचे असेल तर अर्जदाराला त्याचे SBI बचत/चालू खाते असलेल्या शाखेला भेट देऊन कागदपत्रांवर सही करून सर्व आवश्यक गोष्टी पूर्ण कराव्या लागतील. आवश्यक गोष्टी पूर्ण केल्यावर, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर पुढील प्रक्रियेबद्दल माहिती देणारा एक SMS प्राप्त होईल. कर्ज मंजुरीचा एसएमएस मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत तुम्हाला पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

 

एसबीआय ई-मुद्रा कर्जाचे फायदे म्हणजे सुलभ आणि जलद ऑनलाइन अर्ज प्रक्रिया,किमान कागदपत्रे आवश्यक,कमाल कर्जाची रक्कम 01 लाखांपर्यंत आहे, कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून मिळते.एसबीआय ई मुद्रा कर्जासाठी काही पात्रता आहे त्या अर्जदार हा लघु (सूक्ष्म) उद्योजक असावा. अर्जदाराचे SBI च्या कोणत्याही शाखेत चालू/ बचत खाते असावे.अर्जदार किमान 6 महिन्यांसाठी SBI मध्ये चालू/बचत खातेधारक असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे केवायसी पूर्ण असले पाहिजे.अर्जदाराचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडलेला असावा.

 

आता आपण जाणून घेऊया SBI E-Mudra Loanसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत अर्जदाराचे आधार कार्ड, अर्जदाराचे पॅनकार्ड, बचत/चालू खाते क्रमांक आणि अर्जदाराचे खाते ज्या शाखेत सुरू आहे त्याची माहिती, अर्जदाराच्या व्यवसायाचा पुरावा, UIDAI – आधार क्रमांक (खात्यात अपडेट करणे आवश्यक आहे), जातीचे तपशील (जनरल/SC/ST/OBC/ अल्पसंख्याक),अपलोड करण्यासाठी इतर तपशील जसे: GSTN आणि उद्योग आधार (उपलब्ध असल्यास), दुकान आणि व्यवसाय स्थापनेचा पुरावा किंवा इतर व्यवसाय नोंदणी पुरावा (उपलब्ध असल्यास), मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते.

 

या कर्जावर लागणारा व्याजदर हा 9.5% इतका आहे. तरी आता परत पुढचा कालावधी हा पाच वाजता पर्यंतचा आहे. त्याचा ऑनलाईन अर्ज एसबीआय बँकेच्या ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन करू शकतो. या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला एसबीआय ही मुद्रा लोन असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही त्याबाबतचा अर्ज करू शकता व तुम्हाला काही क्षणातच कर्ज उपलब्ध होऊ शकते.

 

अशाप्रकारे तुम्हाला जर या कर्जाच्या आवश्यकता असेल तर नक्कीच तुम्ही याबाबतचा ऑनलाईन अर्ज करू शकता. काही अडचणी आला तर तुमच्या आसपासच्या sbi शाखेत जाऊन त्याबाबतचे संपूर्ण माहिती घेऊ शकता.