जनऔषध केंद्र कसे सुरु करावे : वाचा सविस्तर रोजगार संधी

नमस्कार, मित्रांनो आपल्या देशामध्ये असे बरेच नागरिक आहेत. जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांना महागडी औषध घेणे परवडत नाही. त्यामुळे देशातील सर्व नागरिकांना सहजरित्या आणि स्वस्त दरात औषध उपलब्ध करून देण्यासाठी जन औषधि केंद्र उघडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. (Generic Medicine)

याला केंद्र सरकार प्रधानमंत्री जन औषध केंद्र असे देखील म्हटले जाते. या जनौषधी केंद्रात जनरिक औषधे कमीत कमी दरात उपलब्ध करून दिली जातील.’ प्रधानमंत्री भारतीय जनऔषधि परियोजना अंतर्गत मिळताय परवडणारी औषधे ‘ या लेखात या योजनेविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. आणि आपण आजच्या या लेखात जनावशद सुरू कसे करावे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.(Generic Medicine)

देशातील सर्व नागरिकांना कमी किमतीत औषध उपलब्ध करून देणे हा प्रधानमंत्री जन औषधी केंद्राचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून जनरिक औषध सर्वसामान्य जनतेपर्यंत तसेच सर्वांना परवडतील अशा कमीत कमी किमतीत उपलब्ध करून देणार आहे. जनरिक औषध हे ब्रॅण्डेड कंपनीच्या औषधांमध्ये जे गुणधर्म असणार आहेत. ते गुणधर्म जनरिक औषधांमध्ये देखील असणार आहेत. आणि जनरिक औषधांचा प्रभाव देखील ब्रँडेड औषधाप्रमाणेच असणार आहे. त्या केंद्राच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या सर्व नागरिकांपर्यंत हे औषध पोहोचणार आहे. त्यामुळे ही योजना देशातील सर्व नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना कमी किमतीत योग्य तो औषधोपचार मिळणार आहे.(Generic Medicine)

जुना औषध केंद्र कसे सुरु करावे-(Generic Medicine)
प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खाली दिली आहे.सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
होम पेजवर तुम्हाला Apply for PMBJK या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुम्हाला click here to apply online या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.

या पेजवर तुम्हाला Register Now या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुमच्या स्क्रीनवर नोंदणी फॉर्म उघडेल.
या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, राज्य, युजर आयडी पासवर्ड इत्यादी टाकावे लागतील.
यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
अशा प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी अर्ज करू शकाल.
जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी पात्रता काय आहे?
वैयक्तिक अर्जदार, बी. फार्मा आणि डी. फार्मा पदवी असलेल्या व्यक्ती असणे आवश्यक आहे.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे.ऐनवेळी बदल गृहीत धरावा अधिक माहितीसाठी  शासनाच्या संबंधित विभागाशी संपर्क साधावा ही विनंती.(Generic Medicine)