मित्रांनो, सरकारच्या खूप योजना निघाल्या आहेत. ज्या अंतर्गत सरकार अनेक जणांना भरपूर प्रमाणात मदत करत आहेत. त्यातीलच ही अशी एक योजना आहे की, ज्याच्या साहाय्याने दरवर्षी कामगारांना दहा हजार रुपये दिले जातात. आजच्या या लेखांमध्ये आपण या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
ज्यामध्ये ही योजना कोणती? कशा प्रकारे या योजनेअंतर्गत कामगारांना पैसे दिले जातात? या योजनेचा अर्ज कसा भरावा? त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणती? तसेच हि योजना कोणासाठीही उपायुक्त आहे? व त्याच्या अटी कोणत्या? याची माहिती घेणार आहोत.
या योजनेचे नाव ‘घरेलू कामगार सन्मान निधी’ असे आहे. घरेलू कामगार” याचा अर्थ असुरक्षित तसेच घरेलू काम करण्याकरिता ठेवण्यात आलेला कामगार असा आहे. अशा कामगारांचे काम हे अंशकालीन व घरेलू स्वरूपाचे असते. असे कामगार एकापेक्षा जास्त मालकाकडे काम करत असतात. कामगार व मालक यांचे संबंध हे अंशकालीन स्वरूपाचे असतात. त्यांच्या कामाचे तास हे ठरलेले नसतात.
जस जसे शहरांमध्ये लोकसंख्या वाढत गेली तसतसे घरेलू कामगार करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होत गेलेली आहे. घरेलू कामगार हे कायद्याच्या कोणत्याच भागामध्ये येत नाही. म्हणूनच त्यांना सरकारी काही लाभ मिळावा म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तुम्ही जर महाराष्ट्र घरेलू कामगार यामध्ये मोडत असाल तर त्याची नोंदणी कशाप्रकारे करावी? याची माहिती आपण जाणून घेऊया.
या नोंदणीसाठी काही अटी आहेत त्या म्हणजे अशा की, जो व्यक्ती घरेलू कामगार यामध्ये मोडतो तो व्यक्ती 18 वर्षे पूर्ण व साठ वर्षाच्या आतील असला पाहिजे. ही नोंद करण्यासाठी काही कागदपत्रे लागतात. ती म्हणजे घरेलू कामगार याचा वयाचे दाखला, रहिवासी दाखला, सध्याच्या मालकाचे प्रमाणपत्र किंवा तो घरेलू कामगार आहे असे मालकाचे प्रतिज्ञापत्र, पासपोर्ट साईज तीन फोटो.
अशाप्रकारे या कागदपत्रांच्या सहित नोंद झाल्यानंतर त्यांना घरेलू कामगार म्हणून ओळखपत्र दिले जाते. हे ओळखपत्र मिळाल्यानंतर या ओळखपत्राद्वारे आपल्याला दहा हजार रुपये कसे मिळणार याची आपण आता माहिती घेणार आहोत. ज्या लोकांनी या योजनेचा आधीच लाभ घेतलेला आहे ते लोकांना या योजनेस पात्र नसतात. तसेच या लोकांचे इश्रम कार्ड असणे आवश्यक आहे. हे इश्रम कार्ड असेल तरच त्या व्यक्तींना दरवर्षी दहा हजार रुपये मिळतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पण महाराष्ट्र शासन घरेलू कामगार सन्मान निधी योजना या वेबसाईटवर जाऊन आलेल्या फॉर्मवर आपली व्यवस्थित रित्या माहिती भरून या योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो .अशा प्रकारे आपण शासनाद्वारे दहा हजार रुपये मिळवू शकतो.