Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे ‘या’ दिवशी बँकेत जमा

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे ‘या’ दिवशी बँकेत जम

महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सशक्तीकरणासाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या योजनेचा पहिला टप्पा म्हणजेच काही बहिणींना ज्यांचे फॉर्म सबमिट झाले सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली. अशांना सुरुवातीचे दोन हप्ते म्हणजे रुपये तीन हजार आतापर्यंत मिळाले आहेत.

आता या योजनेचा तिसरा टप्पा प्रगतीपथावर आहे. या तिसऱ्या टप्प्यात तुमच्या महिलांना सुरुवातीला तीन हजार रुपये मिळाले आहेत त्यांना रुपये पंधराशे आता मिळणार आहेत. तर अद्याप ज्यांना एकही रुपये मिळालेला नाही अशा मुलांना आता रुपये 4500 असे एकूण तीन महिन्याचे पैसे खात्यावर जमा होणार आहेत.

पैसे जमा होणार आहेत असे म्हणण्याऐवजी पैसे जमा होत आहेत असे म्हणावे लागेल कारण काल रात्रीपासून काही महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाल्याची माहिती अनेक इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून मिळत आहे. तर हे जे पैसे आता वितरण केले जात आहेत याबाबतची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणाऱ्या यादीत आपले नाव आहे की नाही हे खालील प्रमाणे तुम्हाला चेक करता येईल. त्यासाठी खालील पायरींचा वापर करा.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे ‘या’ दिवशी बँकेत जम

गूगलवर जा आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका, त्यानंतर “कॉर्पोरेशन” हा शब्द लिहा.
शोध निकालांमध्ये, “माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी (जिल्हा) कॉर्पोरेशन” असा पर्याय दिसेल.
या पर्यायावर क्लिक करा.
नवीन पृष्ठावर तुम्हाला लाभार्थी यादी दिसेल.
तुम्ही ही यादी डाउनलोड करू शकता किंवा ऑनलाइन पाहू शकता.

यादीमध्ये तुम्हाला अर्ज क्रमांक, लाभार्थीचे नाव, मोबाईल क्रमांक, अर्जाची स्थिती दिसेल. यामध्ये तुम्ही तुमचे नाव किंवा अर्ज क्रमांक याद्वारे तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता. या यादीत जर तुमचे नाव नसेल तर समजा की तुम्ही या यादीत देखील पात्र नाही. आणि अर्जाची स्थिती तपासून यासाठी काय करावे लागेल ते पहा.

आतापर्यंत या योजनेसाठी दोन कोटी चाळीस लाख पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. आणि प्रत्येक दिवसागणित ही संख्या सध्या वाढत आहे.