Margshirsh Guruwar 2025: आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरूवार! व्रत, पूजा पद्धत, महत्त्व, अजून किती गुरूवार? A टू Z माहिती जाणून घ्या..

Margshirsh Guruwar 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 27 नोव्हेंबर 2025..आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरूवार आहे..हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना (Margshirsh 2025) हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो, अनेक व्रत-वैकल्य, सण, शुभ कार्य या महिन्यात साजरे केले जातात. याहूनही महत्त्वाचं म्हणजे अनेक जण मार्गशार्ष महिन्याच्या प्रत्येक गुरूवारी देवी लक्ष्मीचे (Goddess Lakshmi) प्रतीक म्हणून घट मांडतात, आणि त्याचे व्रत करतात. यंदा मार्गशीर्ष महिना 20 डिसेंबर 2025 पासून सुरु झाला,या दिवशी गुरूवार होता. मात्र त्या दिवशी अमावस्येची छाया असल्याने तो गुरूवार करण्यात आला नाही. यासाठी आज 27 नोव्हेंबर 2025.. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरूवारचे व्रत केले जाणार आहे. या महिन्यात नेमके किती गुरुवार (Margshirsh Guruwar 2025) असतील? तसेच मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे महत्त्व, पूजा विधी काय आहे? जाणून घेऊया..

मार्गशीर्षचा पहिलाच गुरूवार 5 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचा मोठा योगायोग, देवी लक्ष्मी प्रसन्न, मोठा लाभ देणार, तुमची रास?

Loan EMI : गृहकर्ज, कार लोनचा EMI होणार कमी? लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता

Loan EMI : गृहकर्ज, कार लोनचा EMI होणार कमी? लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता

आज मार्गशीर्ष गुरुवार व्रत…(Margshirsh Guruwar 2025)
ज्योतिषींच्या मते, पहिले मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे आज, गुरुवार, 27 नोव्हेंबर 2025 रोजी असेल. 20 नोव्हेंबर रोजी मार्गशीर्षचा गुरुवार असला तरी तो मार्गशीर्ष महिन्याचा नसून अमावस्येचा दिवस होता. त्यामुळे या दिवशी घट मांडला गेला नाही.

Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले

मार्गशीर्ष महिन्यात किती गुरूवार?
पहिला गुरूवार: 27 नोव्हेंबर
दुसरा गुरूवार: 04 डिसेंबर
तिसरा गुरूवार: 11 डिसेंबर
चौथा गुरूवार: 18 डिसेंबर

सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी सर्वात आकर्षक योजना

मार्गशीर्ष गुरुवारचा घट कसा मांडाल?
घट ज्या ठिकाणी मांडाल, तिथली जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक काढावा.
त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा.
चौरंगावर लाल कापड ठेवून त्यावर तांदूळ, त्यावर तांब्याचा कलश ठेवावा.
कलशाला हळद-कुंकु लावून आत पाणी, अक्षता, दूर्वा, एक नाणं आणि सुपारी घालावी.
विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी, पंचपात्र कलशावर ठेवावी, त्यावर नारळ ठेवावा.
लाल कापडावर थोडे तांदूळ पसरवून त्यावर कलशाची स्थापना करा,
आता त्याठिकाणी श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे.
कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा.
यथाशक्ती नैवेद्य दाखवू शकता.

Loan EMI : गृहकर्ज, कार लोनचा EMI होणार कमी? लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता