‘या’ कार्डधारकांना मिळतोय मोफत लाखोंचा सरकारी लाभ….. सरकारकडून मोठी भेट..

मित्रांनो, पॅन कार्ड.. आधार कार्ड Pan Card, Aadhar Card हे दोन कार्ड आपल्या सगळ्यांच्या माहितीतले आहेत. पण या व्यतिरिक्त सरकारची अनेक पाच कार्ड आहेत. की ज्याद्वारे आपल्याला सरकारकडून लाखोंचा लाभ घेता येतो. हा फायदा फक्त तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी असणार आहे. कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी या कार्डद्वारे आपल्याला लाभ घेता येतो.

एका कार्डाच्या मार्फत तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होते. दुसरा कार्ड मार्फत देशभरातील कोणत्याही खाजगी रुग्णालयात तुम्हाला वैद्यकीय सुविधा मिळतील. तिसरा कार्ड मार्फत मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील या कार्डाच्या मार्फत मिळण्याची तरतूद आहे. त्याचबरोबर तुमच्या पश्चात म्हणजे तुमचा काही करनाणे मृत्यु झाला तर, तुमच्या कुटुंबातील लोकांसाठी ही विम्याची देखील सोय या कार्ड द्वारे पुरवली जाते. जर तुम्ही शेतकरी असाल तर शेतीमध्ये लागणाऱ्या साहित्यांसाठी देखील यातील एका कार्डाद्वारे बिन व्याज कर्ज देखील मिळते. Medical Loan, Medical Insurance

आपल्याला पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड या तीनच कार्ड ची माहिती आहे. परंतु ही पाच कार्ड असे आहेत की, ज्याद्वारे सरकार मार्फत आपल्याला लाखोंचा फायदा मिळेल. आजच्या लेखामध्ये आपण या पाच कार्डांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ज्यामध्ये ही पाच कार्ड कोणती? प्रत्येक कार्डाचे कोणकोणते फायदे आहेत? त्याचबरोबर कार्ड काढायचे असल्यास असे काढायचे. यांची संपुर्ण महिती पाहणार आहोत.

पहिलं कार्ड हे शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकरी म्हणजेच ज्याच्या नावावर जमीन आहे त्यांच्यासाठी हे कार्ड आहे. या कार्डचे नाव ‘किसान क्रेडिट कार्ड’ असे आहे. या कार्डाच्या माध्यमातून विविध राष्ट्रीयकृत बँकेतून शेतकऱ्याला ४ टक्के इतक्या कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध होऊ शकते. शेतीसाठी लागणाऱ्या विविध अवजारांसाठी त्याचबरोबर बियाणांसाठी, खतांसाठी जे काही पैसे लागणार आहेत ते या कार्ड मध्ये कर्जाच्या Loan Subcidy  स्वरूपात मिळते. त्याचबरोबर या कार्डाच्या आधारे घेतलेल्या कर्जावर शेतकऱ्यांना सबसिडी देखील मिळते. काही वेळा तरी या कार्डद्वारे घेतलेले कर्ज माफ देखील केले जाते. या किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना 1,60,000 रुपये इतके कर्ज मिळू शकते. बँकेमध्ये या कार्डचे वेगळे असे खाते तयार केले जाते की ज्याद्वारे तुम्हाला Credit Card क्रेडिट कार्ड दिले जातात. या कार्डद्वारे तुम्ही जितके कर्ज घेतले असेल तितक्याच रक्कमेवर व्याजदर लागणार आहे आणि जितक्या कालावधी साठी घेतलेल्या आहेत तितक्याच कालावधीसाठी तो व्याजदर Intrest Rate लागू राहील.

दुसरे जे कार्ड आहे ते अशा लोकांसाठी आहे की, जे लोक कोणत्याही संस्थेत किंवा कोणत्याही कंपनीमध्ये काम करत नाही किंवा त्यांच्यावर पीएफ जमा होत नाही असे लोक. म्हणजे पेंटर, सुतार, प्लंबर, वेल्डर इ. ते कार्ड म्हणजे ‘ई श्रम कार्ड’ हे कार्ड काढल्यामुळे सरकारला यातील Universal Account युनिव्हर्सल अकाउंट नंबर मिळतो. या नंबर द्वारे त्या व्यक्तीची माहिती सरकारला मिळते. जर महामारी आली, दुष्काळ पडला असेल किंवा महापूर आला असेल अशा अपत्यकालीन परिस्थितीमध्ये जर अशा व्यक्तींना कोणत्याही रोजगार उपलब्ध नसतात त्यावेळी अशा लोकांसाठी सरकार त्यांच्या बँक अकाउंट वर डायरेक्ट पैसे ट्रान्सफर करते. की ज्यातून ते व्यक्ती आपल्याला रोजगार मिळू शकतील. हे कार्ड आपण आपल्या मोबाईलच्या साह्याने देखील काढू शकता. eshram.gov.in या लिंक द्वारे हे कार्ड काढता येऊ शकते.

तिसरं जे कार्ड आहे ते तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असे आहे. या कार्डाचे नाव म्हणजे ‘आयुष्यमान भारत कार्ड’ या कार्डाचे नाव तुम्ही ऐकलं असाल या कार्ड मुळे तुम्हाला 5,00,000 रुपये इतकी मेडिकल ट्रीटमेंट मोफत मिळते. जर तुम्हाला कोणतेही मेडिकल ट्रीटमेंट घ्यायचे असेल किंवा तर अपघात झाला असेल किंवा इतर पण त्या गोष्टीमुळे जर तुमच्या ऑपरेशन वगैरे करायचा आहे तर ती या कार्डमार्फत तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जे हॉस्पिटल आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत जोडलेल्या आहेत अशा हॉस्पिटलमध्ये मोफत मध्ये पाच लाख रुपयांची सेवा पुरवली जाईल. हे कार्ड तुम्ही setu.pmjay.gov.in त्याबद्दल हे कार्ड काढू शकता. Health Insurance

चौथे कार्डची आहे ते अशा लोकांसाठी आहे की, जे गरिबी लेखाच्या पण खाली येतात. त्यासाठी भारत सरकारने या कार्डाची सुरुवात केलेली आहे. ते म्हणजे ‘बीपीएल कार्ड’ BPL Card यालाच पिवळे रेशन कार्ड देखील म्हणतात. या कार्डाद्वारे मोफत राशन म्हणजे गहू, तांदूळ, डाळी, कडधान्य यांचे मोफत वाटप केले जाते. त्याचबरोबर विविध प्रकारचे कर्ज देखील या कार्डाद्वारे मिळतात. सरकारी रुग्णालयात मोफत इलाज देखील केला जातो. त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी देखील विविध प्रकारचे स्कॉलरशिप दिली जाते.

पाचवे कार्ड हे बांधकाम कामगारांसाठी असते. त्याचं नाव ‘लेबर कार्ड’ Labour Cardअसे आहे. या कार्ड द्वारे जे काही बांधकाम मजदूर आहेत त्यांना त्यांच्या लागणाऱ्या साहित्यासाठी पैसे दिले जातात. महाराष्ट्र राज्य मध्ये तर अशा लोकांसाठी त्यांना लागणाऱ्या साहित्याची एक पेटीच वाटप केलेले आहे. की ज्या पेटीमध्ये त्यांनी त्यासाठी उपयुक्त असलेली सर्व सामग्री उपलब्ध आहेत. त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप Scholarship दिला जातात त्यांच्या शिक्षणासाठी असलेला खर्च देखील या कार्ड द्वारे तिला जातो.

अशाप्रकारे ही पाच कार्ड आहेत. की, ज्याद्वारे तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेता येतो. वेगवेगळ्या प्रकारचे फायदे मिळवता येतात.